आता माझी सटकली ! काजोलच्या नाही 'या' अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता अजय देवगण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 15:00 IST2020-08-19T15:00:15+5:302020-08-19T15:00:49+5:30
कंगना आणि अजय एकमेकांना ‘ वन्स अपऑन ए टाइम इन मुंबई’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान भेटले होते.

आता माझी सटकली ! काजोलच्या नाही 'या' अभिनेत्रींच्या प्रेमात आकंठ बुडाला होता अजय देवगण
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. मात्र असेही काही उदाहरणं आहेत जे त्यांच्या लग्नानंरही अफेअरमुळे चर्चेत राहिले. बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखला जाणारा अजय देवगणही याच कारणामुळे चर्चेत राहिला. यशस्वी अभिनेता म्हणून नावारुपाला येत असतानाच त्याच्या अफेअर आणि लिंक अपच्या चर्चाही रंगल्या. विविध अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं. त्याचे अनेक अभिनेत्रीसह रिलेशनशिपच्या बातम्या यायच्या. त्याच्या वैवाहिक आयुष्यावरही या गोष्टींचा परिणाम व्हायचा. अजय देवगणचे सर्वाधिक चर्चेत राहिलेले अफेअर होते बेधडक आणि बिनधास्त परखड मत मांडणारी अभिनेत्री कंगना राणौतसह. अजय आणि कंगणाचे अफेअर खूप गाजले.
कंगना आणि अजय एकमेकांना ‘ वन्स अपऑन ए टाइम इन मुंबई’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान भेटले होते. त्या वेळी दोघांची एकमेकांसह जवळीक वाढत गेल्याचे बोलले जाते. काजोल अशा चर्चा आणि अफवांमुळे बरीच वैतागली होती. जेव्हा काजोला या गोष्टी समजल्या तेव्हा काजोला या दोघांना वेगळे करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. अजयला कंगणापासून दूर कसे ठेवता येईल यावर काजोलने सर्वाधिक लक्ष दिले.
याआधी अजय करिश्मा कपूर आणि रवीना टंडनसही अजय देवगणचे नाव जोडलं गेलं. त्यावेळी अजय आणि करिश्माची जोडीही रसिकांना खूप आवडायची. इतकेच नाही तर करिश्मा कपूरला डेट करत असतानाच रवीनाची एंट्री झाली आणि अजयने करिश्माला सोडून रवीनासह जळीक वाढवली.
करिश्मा, रवीना प्रमाणेच तब्बुसह त्याचे घट्ट नाते होते. वयाच्या 47 वर्षांनंतरही तब्बू अविवाहित आहे. यासाठी तब्बू बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगणला जबाबदार मानते. एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत खुलासा केला होता.