आमिर शाहरूखच्या पार्टीत गेला, पण सोबत जेवणाचा डबा घेऊन गेला... पण का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 08:00 IST2022-02-01T08:00:00+5:302022-02-01T08:00:07+5:30

आमिर खान व शाहरूख खान भलेही दोघं चांगले मित्र आहेत. पण  परफेक्शनिस्ट आमिर कधी, कुठे, कसा वागेल याचा नेम नाही...; वाचा, धम्माल किस्सा

when aamir khan reached at shahrukh khan party with his own tiffin | आमिर शाहरूखच्या पार्टीत गेला, पण सोबत जेवणाचा डबा घेऊन गेला... पण का? 

आमिर शाहरूखच्या पार्टीत गेला, पण सोबत जेवणाचा डबा घेऊन गेला... पण का? 

आमिर खान (Aamir Khan) व शाहरूख खान (ShahRukh Khan) भलेही दोघं चांगले मित्र आहेत. पण  परफेक्शनिस्ट आमिर कधी, कुठे, कसा वागेल याचा नेम नाही. होय, हा थ्रोबॅक किस्सा वाचून तुम्हीही हेच म्हणाल. अर्थात कारणाशिवाय आमिर काहीही करत नाही, हेही तुमच्या लक्षात येईल. तर हा धम्माल किस्सा खुद्द आमिरने एका मुलाखतीत  सांगितला होता.  

तर त्याचं झालं असं की, शाहरूखने त्याच्या घरी एक पार्टी आयोजित केली होती. अ‍ॅपलचा सीईओ टिक कुक याच्या स्वागतासाठी ही खास पार्टी आयोजित केली गेली होती. अनेक दिग्गज पार्टीत होते. शाहरूखने न विसरता आमिरलाही या पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. आमिर आला. थोडावेळ थांबून तो निघणार तोच शाहरूखची पत्नी गौरीनं त्याला आणखी काही वेळ थांबण्याची विनंती केली. गौरीचा शब्द आमिर कसा टाळणार?  तो थांबला. यानंतर जेवणाची वेळ झाली, तशी खुद्द गौरी आमिरला जेवणासाठी बोलवायला आली. आमिरही उत्साहात उठला आणि उठता उठता, हो चला... पण, मी माझा स्वत:चा  डबा आणला आहे, असं  म्हणाला. आमिरने घरून जेवणाचा डबा आणल्याचं ऐकताच गौरीलाही धक्काच बसला. पण आमिर तो. आमिरने खरंच डबा काढला आणि खाऊ लागला.

अर्थात यामागे कारण होतं. मुलाखतीत आमिरने त्याचाही खुलासा केला होता. आमिर त्यावेळी ‘दंगल’ सिनेमाची तयारी करत होता आणि स्ट्रिक्ट डाएटवर होता. त्यामुळे त्या दिवसांत जो जिथे कुठे जायचा, तिथे आपल्या जेवणाचा डबा घेऊन जायचा. ‘गजनी’ या सिनेमावेळीही त्याने आपल्या लुकवर प्रचंड मेहनत घेतली होती. तेव्हाही तो असाच डबा घेऊन जायचा. आमिरला मिस्टर परफेक्शनिस्ट का म्हणतात, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच.
आमिरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर लवकरच तो ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. यात करिना कपूरही मुख्य भूमिकेत आहे. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: when aamir khan reached at shahrukh khan party with his own tiffin