रिना दत्ताचा आमिर खानसह १६ वर्ष टिकला संसार,ठरला होता त्यावेळचा सगळ्यात महागडा घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 15:58 IST2021-07-03T15:57:31+5:302021-07-03T15:58:33+5:30
किरण रावस लग्न करण्यासाठी आमिरला पहिली पत्नी रिना दत्ताला घटस्फोट दिल्याचे बोलले गेले. विशेष म्हणजे आमिर आणि रिनाचा त्यावेळचा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.

रिना दत्ताचा आमिर खानसह १६ वर्ष टिकला संसार,ठरला होता त्यावेळचा सगळ्यात महागडा घटस्फोट
चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीण. आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही. त्यामुळेच ''कितने अजीब रिश्ते है यहाँ पे'' या गाण्याच्या ओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात. असं काहीसं आमिर खानबरोबर एकदा नाही तर दोनदा घडले आहे. मुळात बॉलिवूडमध्ये परफेक्ट असणारा आमिर खान त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. नुकतेच पत्नी किरण रावसह आमिर खानने घटस्फोट झाल्याचे जाहीर करताच सा-यांनाच मोठा धक्का बसला आहे. दुस-यांदा संसार मोडल्यामुळे आमिरच्या पहिल्या पत्नीची जोरदार चर्चा होत आहे.आमिरचे पहिले लग्न रिना दत्तासोबत झाले होते.
बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वीच आमिर खान रिनाच्या प्रेमात पडला होता. रिना आणि आमिरचा धर्म वेगळा असल्याने लग्नात प्रचंड अडचणीही आल्या होत्या. अखेर कुटुंबाच्या विरोधात जात त्यांनी लग्न केले. एकमेकांच्या आकंत प्रेमात बुडालेल्या आमिर आणि रिनाने १९८६ साली लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली होती. लग्नावेळी आमिर 'कयामत से कयामत तक' सिनेमाचे शूटिंग करत होता तर रिना शिकत होती.
आमिर आणि रिना या दोघांना इरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रिना दत्ता आणि आमिर खानचा संसार फार काळ काही टिकला नाही. २००२ मध्ये रिना आणि आमिर यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत वेगळे झाले होते. किरण रावसह लग्न करण्यासाठी आमिरला पहिली पत्नी रिना दत्ताला घटस्फोट दिल्याचे बोलले गेले. विशेष म्हणजे आमिर आणि रिनाचा त्यावेळचा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.आमिरने रिनाला ५० कोटी रुपये पोटगीच्या रुपात दिल्याचे बोलले जाते. पहिल्या पत्नीसह घटस्फोटानंतरही दोघांमध्ये मैत्री कायम आहे.
आमिरच नाही तर किरणसह रिना दत्ताची चांगली मैत्री आहे. अनेकदा कामानिमित्त तिघेही एकत्र दिसून येतात.आमिरच्या पानी फॉऊंडेशन या एनजीओची सीईओ त्याची पहिली बायको रिना दत्ता असतानाही किरण राव हिने सत्यमेव जयते वॉटर कप या कॅम्पेनसाठी झटून प्रमोशन केले होते. यावरुन दोघींमध्ये खूप चांगले बॉन्डिंग असल्याचे समोर आले होते.