आलिया-वरूण एकमेकांना टाळतात तेव्हा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 20:57 IST2016-08-20T15:27:08+5:302016-08-20T20:57:08+5:30
ड्रिम टीम टूर’दरम्यान आलिया व वरूणच्या एकत्र स्टेज परफॉर्मन्सने रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. पण शेवटी स्टेजवरील परफॉर्मन्स हा झाला व्यावसायिकतेचा भाग. पडद्यामागचे विचाराल तर आलिया व वरूण या दोघांमध्ये फार काही ‘आॅल वेल’ नसल्याचेच दिसतय.

आलिया-वरूण एकमेकांना टाळतात तेव्हा...!
आ िया भट्ट,वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्रा, कॅटरिना कैफ अशी सगळी टीम ‘ड्रिम टीम टूर’च्या निमित्ताने सध्या अमेरिकेत आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. ‘ड्रिम टीम टूर’दरम्यान आलिया व वरूणच्या एकत्र स्टेज परफॉर्मन्सने रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. पण शेवटी स्टेजवरील परफॉर्मन्स हा झाला व्यावसायिकतेचा भाग. पडद्यामागचे विचाराल तर आलिया व वरूण या दोघांमध्ये फार काही ‘आॅल वेल’ नसल्याचेच दिसतय. अमेरिकेत एकत्र फिरतांना आलिया वरूणची जरा जास्तच काळजी घेत असलेली पाहून सिद्धार्थ (आलियाचा बॉयफ्रेन्ड हो!)नाराज झाल्याची बातमी आली. पाठोपाठ वरूणची कथित प्रेयसी नताशा दलाल हिला सुद्धा आलियामुळे असुरक्षित वाटू लागले असल्याची खबर व्हायरल झाली. यामुळे की काय, आलिया व वरूण एकमेकांना टाळू लागल्याचे दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल, काय पुरावा?? पुरावा आहे. ‘ड्रिम टीम टूर’मधील अनेक फोटोंमध्ये आलिया व वरूण एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून वागत असल्याचे स्पष्ट दिसतेय. एकाही फोटोत आलिया-वरूण सोबत नाही. खरे तर दोघेही बेस्ट फ्रेन्ड आहेत. पण ‘ड्रिम टीम टूर’दरम्यान वागता-बोलताना दोघांमध्ये कुठेतरी ‘दुरावा’ जाणवतोय.आलिया व वरूण दोघेही चेहºयावरील आनंदामागे काहीतरी लपवत असल्याचे स्पष्ट जाणवतेय... तुम्हीही बघा. कदाचित तुम्हालाही पटेल!
![]()
![]()
![]()
![]()
![]()