​जॅकलिनच्या बॅगेत दडलंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 14:29 IST2016-04-19T08:26:17+5:302016-04-19T14:29:14+5:30

जॅकलिनच्या बॅगेत दडलंय काय? बॉलिवूडने आजपर्यंत अनेक विदेशी कलाकारांना सामावून घेतलंय. काहींना आपले बस्तान बसविण्यात यश आलंय तर काही ...

What's wrong with Jacqueline's bag? | ​जॅकलिनच्या बॅगेत दडलंय काय?

​जॅकलिनच्या बॅगेत दडलंय काय?

कलिनच्या बॅगेत दडलंय काय?
बॉलिवूडने आजपर्यंत अनेक विदेशी कलाकारांना सामावून घेतलंय. काहींना आपले बस्तान बसविण्यात यश आलंय तर काही जण अद्यापही धडपडताहेत. श्रीलंकन सुंदरी जॅकलिन फर्नांडीसने हिंदी चित्रपट सृष्टीत आपला जम बसविलाय आणि घड्याळाच्या काट्यानुसार तिचे काम सुरूच असते. ‘यार मेरा सुपरस्टार’ या टी. व्ही. शोच्या सेटवर जॅकलिन सांबितले, ‘कलाकार हे भटके असतात आणि आपल्या कारमध्येच ते राहत असतात. आम्ही खूप प्रवास करीत असतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी भल्या पहाटे जायचे असते ना, त्यावेळी तुम्हाला तुमचा मेकअप आणि इतर गोष्टी त्या कारमध्ये स्वत:च कराव्या लागतात. म्हणूनच मी माझ्या कारमध्ये मला जे हवे ते सर्व जवळ ठेवत असते.
हे झाले कारविषयी? पण ती तिच्या बॅगमध्ये कोणत्या पाच महत्त्वाच्या गोष्टी ठेवत असते, यावर ती म्हणते, ‘च्युर्इंगम, औषधे, वॉलेट, चॉकलेट्स आणि परफ्यूम’ या पाच गोष्टी माझ्या बॅगमध्ये तुम्हाला नेहमीच दिसून येतील. हे म्हणजे अगदीच विचारपूर्वक झाले नाही का?
 

Web Title: What's wrong with Jacqueline's bag?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.