सध्या काय करतेय सलमान खानची पहिली हिरोईन?, जाणून घ्या तिच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 19:37 IST2020-12-17T19:36:39+5:302020-12-17T19:37:07+5:30
सलमान खानची पहिली हिरोईनने बॉलिवूडला रामराम केला आहे.

सध्या काय करतेय सलमान खानची पहिली हिरोईन?, जाणून घ्या तिच्याबद्दल
रेणू आर्याने सलमान खानचा पदार्पणाचा चित्रपट बीवी हो तो ऐसी चित्रपटात काम केले होते. सलमान व रेणू या दोघांचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात रेखा व फारुख शेख मुख्य भूमिकेत होते. सलमान खानने अभिनेत्री रेखा यांच्या दीराची भूमिका साकारली होती.
बीवी हो तो ऐसी हा रेणू आर्याचा पहिला चित्रपट होता आणि या चित्रपटाच्या एका सीनमध्ये सलमान खानला वाचवण्यासाठी रेणूच्या छातीवर गोळी लागते. या सीननंतर कित्येक वर्षे ती सलमानसाठी छातीवर झेलणारी अभिनेत्रीच्या नावाने ओळखली जात होती. यानंतर तिने बंजारन, चाँदनी, सिंदूर और बंदूक आणि आतिशबाज या चित्रपटात काम केले आणि ती इंडस्ट्रीतून गायब झाली. रेणू 1991 साली बंजारन चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत श्रीदेवी व ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते. 29 वर्षांपासून ती गायब आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेणू आता हाऊसवाईफ असून कुटुंबातील लोकांची काळजी घेते आहे. लग्नानंतर तिने मुलं व घर सांभाळून चित्रपटापासून लांब गेली आहे. रेणू वैवाहिक जीवनात व्यग्र आहे. तिला दोन मुली आहे सलोनी आणि दिया. लग्नानंतर रेणू आर्या रेणू सिंग झाली आहे.
रेणूच्या फेसबूक प्रोफाइलवरून मिळालेल्या माहितीनुसार ती सध्या नोएडामध्ये राहते आहे. तिच्या दोन्ही मुलींपैकी एक गुरुग्राममधील मार्केटिंग कंपनीत काम करते.
रेणू जवळपास 29 वर्षांपासून सिनेइंडस्ट्री आणि झगमगाटापासून दूर राहिली आहे. तिचा लूक व लाइफस्टाईल दोन्ही बदलले आहे.
सलमान खानलादेखील रेणूबद्दल माहित नाही. एका मुलाखतीत सलमानने रेणू आणि बीवी हो तो ऐसी बद्दल बोलताना सांगितले होते की, एकदा ती फ्लाइटमध्ये भेटली होती आणि तिला ओळखले नव्हते.