हा आठवतो? जाणून घ्या सध्या काय करतो ‘तुम बिन’चा हा हिरो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 08:00 IST2020-02-21T08:00:00+5:302020-02-21T08:00:01+5:30

एकेकाळी तरूणी करायच्या पाठलाग, आज चाहत्यांना पडला विसर

What Priyanshu Chatterjee went through after Tum Bin | हा आठवतो? जाणून घ्या सध्या काय करतो ‘तुम बिन’चा हा हिरो?

हा आठवतो? जाणून घ्या सध्या काय करतो ‘तुम बिन’चा हा हिरो?

ठळक मुद्देप्रियांशुच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर 1997 मध्ये त्याने मॉडेल मालिनी शर्मासोबत लग्न केले

बाहेरून चकचकीत दिसणा-या ग्लॅमरच्या दुनियेत टिकणे सोपे नाही. येथे झगमगाट आहे, तितकाच अंधार. त्यामुळेच, जो टिकला तो येथे सुपरस्टार म्हणवला जातो आणि अंधारात गुडूप झालेल्यांना येथे ‘फ्लॉप’ म्हणून ओळखले जाते. असाच एक अभिनेता म्हणजे प्रियांशु चॅटर्जी.
‘तुम बिन’ हा सिनेमा पाहिला असेल तर प्रियांशुचा चेहरा तुम्हाला चटकन आठवले. प्रियांशुने बॉलिवूडमध्ये धमाकेदार सुरुवात केली. पण नंतर बॉलिवूडच्या अंधा-या गल्लीबोळात तो असा काही गुडूप झाला की, कदाचित चाहत्यांनाही त्याचा विसर पडला.


2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन’ या सिनेमाने प्रियांशू रातोरात स्टार झाला. मीडियात प्रियांशुच्या पर्सनल लाईफपासून प्रोफेशनल लाईफबद्दलची चर्चा रंगू लागली. पण यानंतर एकाही मोठ्या सिनेमात प्रियांशु दिसला नाही.


अनुभव सिन्हांचा ‘तुम बिन’ हा सिनेमा 13 जुलै 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. यात प्रियांशु आणि सन्दली सिन्हाची रोमॅन्टिक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. फिमेल फॅन्स तर प्रियांशुसाठी अक्षरश: वेड्या झाल्या होत्या.
‘तुम बिन’नंतर प्रियांशु ऐश्वर्या रायसोबत ‘दिल का रिश्ता’ या सिनेमात दिसला. पण या चित्रपटाचा प्रियांशुच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही. यानंतर काही चित्रपटांत तो दिसला. पण त्याचे सर्व सिनेमे धडाधड आपटलेत.


आज प्रियांशु कुठे आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तो आजही चित्रपटांत सक्रिय आहे. पण अगदीच छोट्या भूमिकांपर्यंत मर्यादीत झालाय. प्रियांशु सध्या मुंबईत राहतो. मॉडेलिंग व छोट्या मोठ्या भूमिकांमधून पैसा कमवतो.

प्रियांशुच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर 1997 मध्ये त्याने मॉडेल मालिनी शर्मासोबत लग्न केले. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर 2001 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

Web Title: What Priyanshu Chatterjee went through after Tum Bin