/>बी-टाऊनची डर्टी गर्ल अर्थात विद्या बालननं प्रादेशिक भाषांच्या सीमा ओलांडल्यात.. लवकरच ती मराठीत पदार्पण करतेय.. मात्र आता विद्या देशाच्या सीमाही पार करणार आहे. विद्याला हॉलीवुडच्या सिनेमाची ऑफर आली असेल असा विचार करत असाल तर तसं काहीही नाही.. कारण विद्याला पाकिस्तानी सिनेमात काम करण्याच्या ऑफर मिळू लागल्यात. खुद्द विद्यानं याची कबूली दिलीय. मात्र पाकिस्तानी सिनेमात काम करण्याचा निर्णय सर्वस्वी सिनेमाच्या कथेवर अवलंबून असल्याचं तिनं स्पष्ट केलंय. कथा चांगली असेल तर सिनेमा स्वीकारेन असं तिनं म्हटलंय. आतापर्यंत पाकिस्तानी निर्मात्याची भेट झाली नसून 4-5 फोन आल्याचं तिनं सांगितलंय. तसंच या सिनेमात काम करण्यासाठी विद्याला स्वतःमध्ये बरेच बदल आणावे लागणार असल्याचं बोललं जातंय. विद्यानं पाकिस्तानी सिनेमा 'बोल' पाहिला असून तो आवडल्याचंही तिनं आवर्जून सांगितलंय. शिवाय खामोश पानी हा पाक सिनेमाही चांगला असून तो पाहिला नसल्याचं तिनं म्हटलंय.