'सिंघम'च्या बायकोची 'सटकली', काजोलची अजय देवगणला 'धमकी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 12:27 PM2018-09-25T12:27:05+5:302018-09-25T12:36:50+5:30

बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण एका प्रँकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

what kajol seems angry on ajay devgan prank says no entry of pranks at home | 'सिंघम'च्या बायकोची 'सटकली', काजोलची अजय देवगणला 'धमकी'

'सिंघम'च्या बायकोची 'सटकली', काजोलची अजय देवगणला 'धमकी'

मुंबई - बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण एका प्रँकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सोमवारी (24 सप्टेंबर) अजयने त्याची पत्नी अभिनेत्री काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर काही तासांनी त्यानेच हा एक प्रँक असल्याचं पुन्हा ट्विट केलं. मात्र अजयच्या या मस्करीचा काजोलला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळेच चिडलेल्या काजोलने आता अजय देवगणला एक 'धमकी' दिली आहे. 



अजय देवगणने ट्विटरवर काजोलचा नंबर शेअर करून, 'काजोल भारतात नाही. कृपया तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवर तिला कॉर्डिनेट करा' असं ट्विट केलं होतं. हे ट्विट पाहून अजय आणि काजोलचे चाहते हैराण झाले होते. यावर चिडलेल्या काजोलने ‘तुझे प्रँक्स आता स्टुडिओच्या बाहेरसुद्धा होऊ लागले आहेत असं दिसतंय. पण त्यांना माझ्या घरात घेणार नाही,’ असं उत्तर दिलं आहे. 

OMG ! अजय देवगणने सोशल मीडियावर लीक केला काजोलचा व्हॉट्सअॅप नंबर, झाला ट्रोल

अजयच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी त्याला  सल्ले दिले तर काहींनी काजोलचा नंबर सेव्ह करून तिला व्हॉट्सअॅप मेसेजदेखील पाठवला व त्याचा स्क्रीनशॉट अजय देवगणला ट्विटच्या कमेंटमध्ये शेअर केला. अजयने शेअर केलेला काजोलचा नंबर ट्रू कॉलर आणि व्हॉट्सअॅप या अॅपवर तपासल्यास तो नंबर खरा असल्याचं आढळलं आहे. 


 

Web Title: what kajol seems angry on ajay devgan prank says no entry of pranks at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.