'स्टोलन' सिनेमातील हादरवणारा सीन कोणता? अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:29 IST2025-06-02T17:28:41+5:302025-06-02T17:29:31+5:30

 'स्टोलन'मधील हादरवणाऱ्या सीनबद्दल सिनेमातील प्रमुख अभिनेता अभिषेक बॅनर्जीने खुलासा केला आहे. काय म्हणाला बघा

What is the most shocking scene in the Stolen movie Actor Abhishek Banerjee reveals |  'स्टोलन' सिनेमातील हादरवणारा सीन कोणता? अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केला खुलासा

 'स्टोलन' सिनेमातील हादरवणारा सीन कोणता? अभिनेता अभिषेक बॅनर्जीने केला खुलासा

प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरत 'स्टोलन' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांना एका रोमांचकारी आणि भावनांनी भरलेल्या प्रवासाची झलक मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये न्याय आणि सूड यांची परिसीमा पाहायला मिळणार आहे. एका नाजूक क्षणापासून चित्रपटाचा ट्रेलर सुरु होतो. ट्रेलरच्या शेवटी अनेक धक्कादायक प्रसंग बघायला मिळतात. चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या अभिषेक बॅनर्जीने या चित्रपटातील भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक सीन कोणता हे सांगितलं आहे.

मानसिकरित्या हादरवून टाकणाऱ्या क्षणाचा उल्लेख करताना अभिनेता अभिषेक बनर्जीने त्याचा अनुभव शेअर केला आहे. जेव्हा आईच्या कुशीतून गुंड बाळाला घेऊन जातात, तो सीन खूप भावनिक असल्याचं अभिषेक म्हणाला. या सीनमुळे चित्रपटातील खोल वास्तवाचे दर्शन घडते आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिकच वाढ होते. आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेला 'स्टोलन' पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला आहे.


‘स्टोलन’ हा जंगल बुक स्टुडिओचा चित्रपट असून, याचे दिग्दर्शन करण तेजपाल यांनी केले आहे. त्यांनी गौरव ढिंग्रासह आणि स्वप्नील सालकर (अगडबम) यांच्यासोबत पटकथा लिहिली आहे. चित्रपटात अभिषेक बनर्जी, हरीश खन्ना, मिया मेलझर, सहिदुर रहमान आणि शुबम वर्धन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून अनुराग कश्यप, किरण राव, निखिल अडवाणी आणि विक्रमादित्य मोटवाने यांची साथ लाभली आहे.  'स्टोलन' हा चित्रपट ४ जून रोजी Prime Video वर सर्वांना पाहायला मिळेल.

Web Title: What is the most shocking scene in the Stolen movie Actor Abhishek Banerjee reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.