​हे काय?? इरफान-कंगनातही बिनसले??

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 17:00 IST2016-05-24T11:30:05+5:302016-05-24T17:00:05+5:30

कंगना रानोट हिचे हृतिकसोबत बिनसल्याचे तुम्ही जाणताच. पण आपल्या दमदार अभियनयासाठी ओळखला जाणारा इरफान खान आणि कंगना यांच्यातही काही ...

What is this ?? Irfan-kanganahi binasale ?? | ​हे काय?? इरफान-कंगनातही बिनसले??

​हे काय?? इरफान-कंगनातही बिनसले??

गना रानोट हिचे हृतिकसोबत बिनसल्याचे तुम्ही जाणताच. पण आपल्या दमदार अभियनयासाठी ओळखला जाणारा इरफान खान आणि कंगना यांच्यातही काही तरी बिनसल्याचं वाटतय. अलीकडच्या काही दिवसांत इरफानने कंगनाला लगावलेले टोले आणि यावर कंगनाने दिलेले उत्तर यावरून तरी तसेच दिसते. पण मुळात यांच्यात बिनसले कसे?? तर कंगना व इरफान या दोघांकडे ‘डिवाइन लवर्स’नामक एक चित्रपट चालून आला होता. मात्र मला केवळ सोलो लीडमध्ये स्वारस्य आहे, असे सांगून इरफानसोबतचा हा चित्रपट कंगनाने धुडकावून लावल्याचे कळते. निश्चितपणे कंगनाचा हा नकार इरफानला चांगलाच झोंबला.मग काय, यावर उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा इरफाननेही कंगनाला जोरदार पंच मारला. कंगना इतकी समोर निघून गेली आहे की, मला जेव्हा हिरोईन म्हणून काम करायचे असेल तेव्हाच मी तिच्याशी काम करू शकेल. म्हणजे  कंगना हिरो असेल आणि मी हिरोईन, त्याच चित्रपटात आम्ही एकत्र येऊ शकू, असे इरफान म्हणाला. इरफानच्या या पंचवर उत्तर देण्याची वेळ यावेळी कंगनाची होती. यावर तिने काय, उत्तर दिले माहितीयं??  इरफान मला कायम डिवचत असतो, असे उत्तर तिने दिले. होय, इरफान मला कायम डिवचत असतो.एका म्यानमध्ये दोन तलवारी राहू शकत नाही, असे एकदा इरफान मला म्हणाला होता. मला त्यावेळी काहीच कळले नव्हते. पण काहीही असले तरी भूमिकेची पर्वा न करता इरफान सरांसोबत काम करायला मला आवडेल, असे कंगना म्हणाली..आता इरफान कंगनाला डिवचतोय की कंगना इरफानवर भारी पडू इच्छितेयं, हे दोघांनाच ठाऊक!!

Web Title: What is this ?? Irfan-kanganahi binasale ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.