आलिया तुला झाले तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 17:21 IST2016-12-22T17:20:39+5:302016-12-22T17:21:42+5:30
आलिया भट्ट जेव्हा केव्हा घराबाहेर पडते, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. याचे कारण म्हणजे आलियाचा जबरदस्त फॅशन सेन्स. पण ...

आलिया तुला झाले तरी काय?
आ िया भट्ट जेव्हा केव्हा घराबाहेर पडते, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळतात. याचे कारण म्हणजे आलियाचा जबरदस्त फॅशन सेन्स. पण अलिकडे आलियाला चित्रविचित्र लूक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. अलीकडे आलिया विमानतळावर दिसली. यावेळी आलियाला पाहून अनेकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास होईल. स्टार वॉर टी-शर्ट, त्यावर लांब डेनिम जॅकेट आणि हाईडआऊट वेल्वेट पॅन्ट अशा अवतारात आलिया विमानतळावर दिसली. पण आलियाने काय विचार करून हा वेल्वेट पॅन्ट निवडला असावा, असाच प्रश्न सगळ्यांना पडला. वेल्वेट पुन्हा फॅशनमध्ये आलाय, हे आम्ही जाणतो. पण यावेळी मात्र आलियाचा फॅशन सेन्स तिला स्वत:लाच दगा देऊन गेला. आलियाचा विमानतळावरील हा लूक तिचा आत्तापर्यंतचा सर्वांत खराब लूक ठरला. या लूकमधील काय चांगले राहिले तर केवळ तिचे शूज आणि तिच्या चेह-यावरचे हास्य.
![]()
फॅशनच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये नव-नवे प्रयोग होताना आपण पाहिलेत आणि पाहतोयं. पण कधीकधी बॉलिवूड कलाकारांचा फॅशन सेन्स कल्पनेपलिकडचा असतो. आलियाचे हे ताजे लूक पाहता काहीसे असेच म्हणावे लागेल. कदाचित म्हणूनच आलियाला कंगना राणौत हिचा फॅशन सेन्स कौतुकास्पद वाटत असावा. कॉफी विद करणच्या पाचव्या सीझनमध्ये आली असताना आलियाने कबुल केले होते. कंगना साधी विमानतळावर दिसली तरी ती परफेक्ट लूकमध्ये असते. ती हे सगळे कसे मॅनेज करीत असेल, हाच मला कधीकधी प्रश्न पडतो,असे आलियाने यावेळी म्हटले होते.
आलियाला खरोखरच असा प्रश्न पडत असावा, याची आम्हाला तरी खात्री पटलीय. एकंदर काय, तर फॅशनच्या बाबतीत आलियाने कंगनाकडून निश्चितपणे काही टीप्स घ्यायला हव्यात. आम्हाला तरी असेच वाटतेय, तुमचे काय मत आहे?