शाहरुख खानकडे असं काय आहे जे इतर सुपरस्टार्सकडे नाही?, खुद्द किंग खाननं दिलं या प्रश्नाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 19:09 IST2023-06-13T19:08:56+5:302023-06-13T19:09:54+5:30
Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान लवकरच जवान चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुख खानकडे असं काय आहे जे इतर सुपरस्टार्सकडे नाही?, खुद्द किंग खाननं दिलं या प्रश्नाचं उत्तर
शाहरुख खान(Shahrukh Khan)साठी हे वर्ष खूप खास आहे. या वर्षाची सुरुवात पठाणने केली, ज्यावर लोकांनी खूप प्रेम केले आणि आता जवानमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे शाहरुख त्याच्या चाहत्यांशी सतत संपर्कात आहे. सोमवारी पुन्हा एकदा आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान शाहरुख त्याच्या चाहत्यांसमोर आला आणि त्याने प्रत्येक प्रश्नाला त्याच्या खास शैलीत उत्तरे दिली.
सोमवारी संध्याकाळी आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान शाहरुख खानच्या चाहत्यांनी त्याला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. एकाने विचारले की त्यांच्याकडे काय आहे जे इतर कलाकारांकडे नाही. यावर शाहरुखच्या बुद्धीने सर्वांचीच मनं जिंकली. शाहरुखने उत्तरात लिहिले की, माझ्याकडे DDLJ, कुछ कुछ होता आहे, देवदास आहे, स्वदेस आहे, चक दे इंडिया आहे, पठान आहे, ओम शांती ओम आहे… ओह दिखावा करणे थांबवावे लागेल..यासोबतच शाहरुखने हसणारे इमोजी देखील शेअर केले आहेत.
जवान ७ सप्टेंबरला होणार रिलीज
शाहरुख खानचा या वर्षातील दुसरा मोठा चित्रपट जवान ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. यापूर्वी तो जूनमध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव ते सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. सध्या चाहत्यांना कशाची तरी प्रतीक्षा आहे, तर तो म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. आस्क मी एनीथिंग मधील चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखने लवकरच जवानचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची कबुली दिली. सध्या त्याने सोमवारी रात्री दिग्दर्शक ऍटलीसोबत चित्रपट पाहण्याचा बेत आखला आहे. त्यानंतरच त्याचा अंतिम ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. पठाणनंतर शाहरुख खानचा जवान रिलीज होणार आहे आणि डंकी देखील यावर्षी रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, या संदर्भात शाहरुखने नुकताच काश्मीर दौरा केला होता.