वाढत्या वयाविषयी अक्षयकुमारने ‘हे’ काय म्हटले?, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 11:22 IST2017-09-17T17:20:15+5:302017-09-18T11:22:30+5:30
बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षयकुमार ५० वर्षांचा झाला आहे. परंतु अशातही तो त्याच्या लूक, आकर्षक शरीर, स्टंट ...
.jpg)
वाढत्या वयाविषयी अक्षयकुमारने ‘हे’ काय म्हटले?, जाणून घ्या!
ब लिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षयकुमार ५० वर्षांचा झाला आहे. परंतु अशातही तो त्याच्या लूक, आकर्षक शरीर, स्टंट आणि जोश यामुळे वाढत्या वयावर मात करताना दिसत आहे. होय, अक्कीच्या मते, माझ्यातील जोशच मला पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत आहे, तर इंडस्ट्रीतील काही एक्सपर्टच्या मते, अक्षय सर्वोत्कृष्ट कथांच्या माध्यमातून स्वत:मध्ये बदल करण्यात आणि नावीण्यपण आणण्यात यशस्वी होत आहे. शिवाय त्याच्या याच तंत्रामुळे त्याचे चित्रपटही बॉक्स आॅफिसवर हिट ठरत आहेत. ‘सौगंध’ या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया अक्षयच्या ‘खिलाडी’ (१९९२) या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त यश मिळविले होते. काही दिवसांपूर्वीच अक्षयला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या अक्षय त्याच्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमुळे चर्चेत आहे.
अभिनेता म्हणून तब्बल २६ वर्षे इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या अक्षयने खरं तर लंबी पारी खेळली असेच म्हणावे लागेल. मात्र अशातही तो स्वत:ला तरूण समजून इंडस्ट्रीत योगदान देत आहे. त्याच्या मते, कुठलाही नवीन चित्रपट साइन करताना तो तरुण कलाकाराप्रमाणे उत्साहित असतो. अक्षयने म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आजही मी असे समजतो की, जणू दोन आठवड्यांपूर्वीच माझ्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तुम्ही ‘वादा रहा सनम’ हे गाणं सुरू करा त्यावर मी लगेचच डान्स करायला सुरुवात करतो’ असेही अक्षयने म्हटले.
अक्षय सध्या त्याच्या आगामी ‘पॅडमॅन’, ‘२.०’, आणि ‘गोल्ड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या अक्षयकडे बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून बघितले जाते. अर्थात यासाठी त्याला प्रचंड परिश्रमही घ्यावे लागले आहे. अक्षय केवळ इंडस्ट्रीमध्येच नव्हे तर सामाजिक कार्यातही सहभागी होतो. सैनिकांप्रती त्याने नेहमीच भूमिका मांडताना त्यांच्या हिताचा विचार केला आहे. ऐवढा मोठा सुपरस्टार असतानाही अक्षय सर्वसामान्यांशी जोडलेला आहे. त्यामुळेच कदाचित तो आज यशस्वी अभिनेता आहे. लोक त्याच्या प्रत्येक चित्रपटाला भरूभरून प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच सलमान, शाहरूखसारख्या सुपरस्टार्सचे चित्रपट फ्लॉप होत असताना अक्षयचे चित्रपट मात्र कोटींचा व्यवसाय करीत आहेत.