What..!! 'राउडी राठौर २'मधून अक्षय कुमारचा पत्ता कट? पॅन इंडिया स्टार घेणार अभिनेत्याची जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 09:58 IST2025-11-10T09:57:40+5:302025-11-10T09:58:55+5:30
Rowdy Rathore Movie Sequel : २०१२ साली रिलीज झालेला 'राउडी राठौर' सिनेमात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा होती. आता या सिनेमाचा सीक्वल बनणार आहे. पण, यात अक्षय कुमार दिसणार नाही.

What..!! 'राउडी राठौर २'मधून अक्षय कुमारचा पत्ता कट? पॅन इंडिया स्टार घेणार अभिनेत्याची जागा
२०१२ साली रिलीज झालेला 'राउडी राठौर' सिनेमात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा होती. सध्या या सिनेमाच्या सीक्वलची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे की, या चित्रपटातून अक्षयचा पत्ता कट करण्यात आला आहे.
अक्षय कुमारचा २०१२ मध्ये आलेला अॅक्शन कॉमेडी चित्रपट 'राउडी राठौर' आजवरच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी आता त्यांच्या या हिट चित्रपटाच्या सीक्वलची योजना आखत आहेत. मात्र, यावेळी अक्षय कुमार 'विक्रांत सिंग राठौर'च्या भूमिकेत परतणार नाही, तर त्याच्या जागी एक पॅन इंडिया स्टार दिसू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भन्साळी स्टुडिओने 'राउडी राठौर'वर मोठे पाऊल उचलण्याचा आणि त्याला एका फ्रँचायझीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. भन्साळी प्रॉडक्शन्स 'राउडी राठौर २' सह अनेक प्रमुख प्रोजेक्ट्सवर सक्रियपणे काम करत आहे. ही स्टुडिओच्या सर्वात मोठ्या फ्रँचायझींपैकी एक आहे, ज्याचा पॅन इंडिया फॅन बेस मजबूत आहे.
अक्षय कुमार 'राउडी राठौर २'चा भाग नसणार
कलाकारांची निवड अजून निश्चित झालेली नाही आणि चित्रपट अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र, हे देखील सांगण्यात आले आहे की 'राउडी राठौर २' मध्ये आता अक्षय कुमार दिसणार नाही, तर त्याची जागा एका मोठ्या पॅन इंडिया स्टारने घेतली आहे. होय, चित्रपटाच्या व्यापक लोकप्रियतेमुळे निर्माते एका मोठ्या पॅन इंडिया स्टारला मुख्य भूमिकेत घेण्याचा विचार करत आहेत. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी यावर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
पहिला चित्रपट ठरलेला सुपरहिट
'राउडी राठौर'मध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. प्रभू देवा दिग्दर्शित हा चित्रपट २००६ च्या तेलुगू चित्रपट 'विक्रमारकुडू'चा अधिकृत हिंदी रिमेक होता. याला प्रेक्षकांनी खूप पसंत केले आणि बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.
वर्कफ्रंट
दरम्यान, वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, अक्षय कुमार लवकरच 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 'वेलकम' (२००७) आणि 'वेलकम बॅक' (२०१५) नंतर 'वेलकम फ्रँचायझी'चा तिसरा चित्रपट आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला कतरिना कैफ, परेश रावल, अनिल कपूर, नाना पाटेकर आणि मल्लिका शेरावत स्टारर 'वेलकम' सुपरहिट ठरला आणि 'कल्ट क्लासिक बॉलिवूड कॉमेडी चित्रपट'चा दर्जा मिळवला. 'वेलकम ३'ची रिलीज डेट अजून जाहीर केलेली नाही.