​जॅकलीनला व्हायचेयं ‘सुपरवूमन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 19:28 IST2016-08-01T13:56:45+5:302016-08-01T19:28:03+5:30

श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस ‘अ फ्लार्इंग जट’ या आगामी चित्रपटात सुपरहिरोच्या प्रेमिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण कदाचित जॅकलीनला ...

Welcome to Jacqueline 'Supervium' | ​जॅकलीनला व्हायचेयं ‘सुपरवूमन’

​जॅकलीनला व्हायचेयं ‘सुपरवूमन’

रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस ‘अ फ्लार्इंग जट’ या आगामी चित्रपटात सुपरहिरोच्या प्रेमिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण कदाचित जॅकलीनला सुपरहिरोच्या प्रेमिकेची भूमिका साकारण्यात काहीही रस नाही. होय, कारण जॅकलीनला सुपरहिरोची प्रेमिका नाही तर सुपरवूमनची भूमिका साकारण्याची इच्छा आहे.रेमो डिसुझा दिग्दर्शित सुपरहिरो-अ‍ॅक्शन चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’मध्ये टायगर श्रॉफ सुपरहिरो बनला आहे. तर जॅकलीन टायगरची प्रेयसी बनली आहे. याच पार्श्वभूमीवर जॅकलीनने सुपरवूमनची भूमिका साकारण्याची इच्छा बोलून दाखवली. भविष्यात माझ्या वाट्याला सुपरवूमनची भूमिका येईल, याबाबत मी आशावादी आहे. रेमोशी बोलले आहे. त्याने मनात आणले तर सुपरवूमन बनण्याचा मार्ग मोकळा व्हायला वेळ लागणार नाही, असे जॅकलीन हसत हसत म्हणाली. जॅकलीन तुझी ही इच्छा लवकर पूर्ण होवो, हीच शुभेच्छा!

Web Title: Welcome to Jacqueline 'Supervium'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.