‘द विकेंड’ पॉर्न चित्रपट नाही- पूनम पांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 14:22 IST2016-09-14T08:04:45+5:302016-09-14T14:22:43+5:30
नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी पूनम पांडे आपले हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करुन हॉट विधानेदेखील करीत असते असे तिच्याबाबतीत ...
.jpg)
‘द विकेंड’ पॉर्न चित्रपट नाही- पूनम पांडे
‘मी खूप कष्टाळू अभिनेत्री असून आजपर्यंतचा प्रवास मी फक्त माझ्या मेहनतीने पार केला आहे. विशेष म्हणजे मला कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नाही किंवा कपूर आणि खानसारखे आडनावही नाही. मी वादग्रस्त गोष्टी लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी करते. तुम्ही ( मीडिया ) लोकांनी मला बनवले आहे. काहीतरी चांगले करण्याचा मी आज प्रयत्न करीत आहे,’ असे पूनम पांडे म्हणाली. तिच्या 'द विकेंड' या शॉर्टफिल्मच्या पत्रकार परिषदेत पूनम बोलत होती.
स्त्रीप्रधान चित्रपटांचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये सुरू आहे. याविषयी ती म्हणाली, ‘ बॉलिवूडमध्ये स्त्रीकेंद्रीत चित्रपट बनत आहेत ही गोष्ट चांगली आहे. प्रेक्षकांनीही त्याला चांगली साथ दिली आहे, त्यमुळे वादग्रस्त गोष्टी कशाला करायच्या असे मला वाटते. विनोदाचा भाग सोडला तरी, मी 'द विकेंड' बनवलाय कारण अशा प्रकारचे चित्रपट लोकांना आवडतात. गोष्टी बदलत आहेत. त्यामुळे काहीतरी चांगले करण्यास काय हरकत आहे ?’
'द विकेंड' विषयी बोलताना ती म्हणाली, ‘हा पॉर्न चित्रपट नाही. संपूर्णपणे आशय आणि अभिनय असलेला हा चित्रपट आहे. पूनम पांडेने हा बनवला असल्यामुळे तुम्ही वेगळा विचार कराल पण तसे नाही.’
आर्यन सिंग यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. पूनम पांडे आणि सुरेश नाकुम याचे निमार्ते आहेत. 'द विकेंड' २४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.