लग्न करण्याआधी शाहिदने करिना कपूर, हृषिता भट्ट आणि या अभिनेत्रींना केले होते डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 12:46 IST2017-02-25T07:13:37+5:302017-02-25T12:46:26+5:30

शाहिद कपूरचा रंगून हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्याचसोबत शाहिदने 36व्या वर्षी ...

Before the wedding, Shahid did Kareena Kapoor, Hrishita Bhatt and the actresses to date | लग्न करण्याआधी शाहिदने करिना कपूर, हृषिता भट्ट आणि या अभिनेत्रींना केले होते डेट

लग्न करण्याआधी शाहिदने करिना कपूर, हृषिता भट्ट आणि या अभिनेत्रींना केले होते डेट

हिद कपूरचा रंगून हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्याचसोबत शाहिदने 36व्या वर्षी पदार्पण केले आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबाबत या कधीही न ऐकलेल्या गोष्टी...


शाहिद कपूरने इश्क विश्क या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर कमिने, विवाह, जब वी मेट यांसारखे त्याने अनेक हिट चित्रपट दिले. शाहिद सगळ्यात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर एका जाहिरातीसाठी झळकला होता. कॉम्प्लॅनच्या जाहिरातीत त्याने अभिनेत्री आयशा टाकियासोबत काम केले होते. त्यावेळी शाहिद आणि आयशा दोघेही खूपच लहान होते. 

shahid kapoor in complan ad

शाहिद आज एक प्रसिद्ध अभिनेता असला तरी त्याने कधीच अभिनयाचा विचार केला नव्हता. त्याला एक प्रसिद्ध डान्सर व्हायचे होते आणि त्यासाठी तो शामक दावरच्या इन्स्टिट्युटमधून नृत्य शिकत होता. अनेक वर्षं नृत्य शिकल्यानंतर तो शामकच्या ग्रुपसोबत स्टेज शो करत असे. 

shahid kapoor dance
इश्क विश्क हा शाहिद कपूरचा पहिला चित्रपट असला तरी ताल या चित्रपटात तो केवळ काही सेकंदासाठी कही आग लगे लग जाएँ या गाण्यात झळकला होता. तसेच दिल तो पागल है या चित्रपटातील काही गाण्यांमध्येदेखील त्याने बँकराऊंड डान्सर म्हणून काम केले होते. 

shahid kapoor in taal

शाहिद कपूरचे मीरा रजपूतसोबत लग्न झाले असून त्या दोघांना एक मुलगीदेखील आहे. पण शाहिद आणि मीराचे लग्न व्हायच्याआधी शाहिदच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या होत्या. करिना कपूरसोबतचे तर शाहिदचे प्रेमप्रकरण खूपच गाजले होते. करिनाच्या आधी शाहिद हृषिदा भट्टसोबत नात्यात होता. आँखो में तेरा ही चेहरा या अल्बमच्या चित्रीकरणाच्यावेळी त्या दोघांची ओळख झाली होती. तसेच प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, अमृता अरोरा, विद्या बालन या अभिनेत्रींसोबतही त्याची नावे जोडली गेली होती. 

shahid kapoor kareena kapoor

शाहिद कपूर हा शाकाहारी आहे. ब्रायन हाइन्स यांचे लाइफ इज फेअर हे पुस्तक वाचल्यानंतर शाहिदने मांसाहारी खाणे सोडून दिले होते. शाहिदची पूर्वप्रेयसी करिना कपूरनेदेखील शाहिदच्या सांगण्यावरूनच मांसाहारी पदार्थांचा त्याग केला. 

shahid kapoor
शाहिद हा प्रसिद्ध अभिनेता पंकज कपूर आणि अभिनेत्री नीलिमा अझीम यांचा मुलगा असून सुप्रिया पाठक त्याची सावत्र आई आहे. 

shahid kapoor pankaj kapoor

Web Title: Before the wedding, Shahid did Kareena Kapoor, Hrishita Bhatt and the actresses to date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.