मल्याळम सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत इतका महत्वाचा का आहे? अक्षय कुमारने विचारलेल्या प्रश्नाला मोहनलालने दिलं उत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 19:18 IST2025-05-01T19:14:20+5:302025-05-01T19:18:58+5:30
सध्या मुंबईत आज १ मे ते ४ मे २०२५ पर्यंत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये Waves Summit 2025 चं आयोजन करण्यात आलं आहे.

मल्याळम सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत इतका महत्वाचा का आहे? अक्षय कुमारने विचारलेल्या प्रश्नाला मोहनलालने दिलं उत्तर, म्हणाले...
Waves Summit 2025: सध्या मुंबईत आज १ मे ते ४ मे २०२५ पर्यंत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये Waves Summit 2025 चं आयोजन करण्यात आलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या परिषदेचं उद्धाटन करण्यात आलं आहे. मनोरंजन क्षेत्रात या शिखर परिषदेला महत्वाचं मानलं जातं. या कार्यक्रमात हिंदीसह साउथ इंडस्ट्रीतील अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली. या परिषदेमध्ये हेमा मालिनी, चिरंजीवी आणि अक्षय कुमार तसंच दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागा चैतन्य, शोभिता धुलिपाला, सारा अली खान हे कलाकार देखील उपस्थित होते. त्याचदरम्यान, मंचावर सूत्रसंचालन करणाऱ्या अक्षय कुमारने मोहनलाल यांना विचारलेल्या एका प्रश्नाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
दरम्यान, अक्षय कुमारने या परिषदेत मल्याळम सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत इतका महत्वाचा मानला जातो. तर मनोरंजनात्मक मसाला एंटरटेनमेंट असलेला सिनेमा आणि कलात्मक सिनेमा एकत्र हातात हात घालून चालू शकतात, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मोहनलाल म्हणाले, 'मल्याळम चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा भाग म्हणल्याबद्दल धन्यवाद. परंतु मल्याळम सिनेमांच्या बाबतीत असं काही नाही. दोघांमध्ये समतोल आहे. मळ्यालम इंडस्ट्रीला चांगले कलाकार मिळाले आहेत. मी अनेक मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. त्यांनी कलात्मकदृष्टीने सिनेमे बनवले आहेत. त्या चित्रपटांमध्ये मनोरंजन हे केंद्रस्थानी होतं. दुसरीकडे, मनोरंजनात्मक चित्रपटातही कला होती."
त्यानंतर पुढे मोहनलाल म्हणाले- "मल्याळम सिनेमा कथानकाच्या बाबतीत खूप पुढे आहे. माझ्या ४८ वर्षांच्या प्रवासत मी अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.त्यापैकी व्यावसायिक चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे तसेच कलात्मक चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक होते. याआधी मल्याळममध्ये व्यावसायिक चित्रपट आणि कला चित्रपट बनवले जायचे. पण, आता नवीन दिग्दर्शक कंन्टेन्टला जास्त महत्व देत आहेत. त्यामुळे याबाबतीत मी ठाम असं काही सांगू शकत नाही." असं मोहनलाल यांनी सांगितलं.
Waves सारख्या कार्यक्रमातून देशातील तरुण पिढीला प्रेरणा देणं, त्यांचं मनोबल वाढवणं आणि त्यांना देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी करून घेणं हेच या भेटीमागचं प्रमुख उद्दिष्ट होतं. उपस्थितांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि ही संधी नव्या कल्पनांना, नव्या ऊर्जा निर्माण करणारं एक व्यासपीठ ठरली. हे खरंच ‘नवा भारत’ घडवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल होतं.