मुंबई जलमय...! अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरही गुडघाभर पाणी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 10:04 IST2019-07-02T10:03:02+5:302019-07-02T10:04:16+5:30
मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हेही यातून सुटलेले नाहीत.

मुंबई जलमय...! अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेरही गुडघाभर पाणी!!
मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हेही यातून सुटलेले नाहीत. होय, अमिताभ यांच्या घराबाहेरच्य रस्त्यावरही गुडघाभर पाणी साचले आहे. आता तर हे पाणी घरात शिरू पाहतेय.
मुंबईत थोडाही पाऊस झाला की, अमिताभ यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. प्रत्येक पावसाळ्यात अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेरचा रस्ता पाण्याने भरून वाहतो. याचे मुख्य कारण म्हणजे, हा परिसर समुद्राच्या जवळ आहे.
बीएमसीनुसार, मुसळधार पावसात समुद्राशी जुळलेल्या ड्रेनचे पाणी मागे वाहू लागले. ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. यामुळे ‘जलसा’ बाहेर दरवर्षी पाणीच पाणी दिसते. तूर्तास या मार्गावर साचलेल्या पाण्याचा उपसा करण्याचे काम सुरु आहे.
अमिताभ ज्या भागात राहतात, त्या भागात फिल्म इंडस्ट्रीतीन अनेक दिग्गज राहतात. अक्षय कुमार, हृतिक रोशन, दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची घरेही याच भागात आहे. पृथ्वीराज कपूर यांनी साकारलेले पृथ्वी थिएटरही याच मार्गापासून जवळ आहे. पण सखल भाग आणि ड्रेन ओपनिंगमुुळे ‘जलसा’बाहेर दर पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचते.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचे तर ते सध्या ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात बिझी आहेत. या चित्रपटाचे फर्स्ट लूकही जारी झले आहेत. या चित्रपटाशिवाय ते ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच ते छोट्या पडद्यावरही वापसी करणार आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ हा त्यांचा शो येत्या आॅगस्टपासून सुरु होणार आहे.