सुरवीन चावलाच्या लग्नाचा व्हिडीओ बघून तुम्ही विरूष्काचे लग्न विसरून जाल, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 18:37 IST2017-12-28T13:07:33+5:302017-12-28T18:37:45+5:30

गेल्या काही दिवसांपासून विरूष्काच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगत आहे. आता विरूष्काप्रमाणे अभिनेत्री सुरवीन चावला हिनेही गुपचूप लग्न केल्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Watching the video of Surwin Chawla's wedding, you will forget Virus's wedding, see the video! | सुरवीन चावलाच्या लग्नाचा व्हिडीओ बघून तुम्ही विरूष्काचे लग्न विसरून जाल, पाहा व्हिडीओ!

सुरवीन चावलाच्या लग्नाचा व्हिडीओ बघून तुम्ही विरूष्काचे लग्न विसरून जाल, पाहा व्हिडीओ!

लिवूडमध्ये सध्या गुपचूप लग्न करण्याचा जणू काही ट्रेंडच बनला आहे. अगोदर अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीत गुपचूप लग्न उरकल्यानंतर अभिनेत्री सुरवीन चावला हिनेही अशाच अंदाजात लग्न केले आहे. लग्न केल्यानंतर अचानकच सुरवीनने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून तिच्या चाहत्यांना चकीत केले आहे. होय, जेव्हा सुरवीनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा सगळेच अचंबित झाले. शिवाय तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षावही केला. 

सुरवीनने बॉयफ्रेंड अक्षय ठक्कर याच्याशी विवाह केला. वास्तविक तिने दोन वर्ष अगोदरच लग्न केले होते, परंतु त्याचा खुलासा केला नसल्याने तिने पुन्हा अशाप्रकारे शाही विवाह केला. असो, ‘सीएनएक्स मस्ती’कडून सुरवीनला तिच्या मॅरेज लाइफसाठी भरपूर शुभेच्छा! सध्या सुरवीनच्या लग्नाचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, तिने अतिशय थाटामाटात लग्न केल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. 
 

व्हिडीओमध्ये अतिशय शाही अंदाजात सुरवीनने आपला विवाहसोहळा उरकला. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच स्पष्ट केले की, सुरवीनच्या लग्नाचे व्हिडीओ बघताच तुम्ही विरुष्काचे लग्न विसरून जाल. दरम्यान, व्हिडीओमध्ये सुरवीन पांढºया रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे, तर दुसºया एका व्हिडीओमध्ये सुरवीन आपल्या पतीसोबत दिसत आहे. सुरवीनने हे व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, एका सामान्य आयुष्यात मी आणि माझी कथा एखाद्या परीकथेप्रमाणे आहे.’
 

पण काहीही असो, सुरवीनने गुपचूप विवाह उरकल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच नाराजी असेल यात शंका नाही. केवळ सुरवीनच नव्हे तर विराट-अनुष्का, इशिता दत्ता-वत्सल या जोडप्यांनीही २०१७ मध्ये गुपचूप लग्न उरकत चाहत्यांना धक्का दिला. 

Web Title: Watching the video of Surwin Chawla's wedding, you will forget Virus's wedding, see the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.