हा ​प्रमो पाहाच : सलमानने दिली शाहरूखवरच्या प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 19:19 IST2016-06-30T13:49:56+5:302016-06-30T19:19:56+5:30

‘सुल्तान’च्या नव्या प्रमोत सलमान शाहरूखबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे.

Watching this promo: Salman confesses his love affair | हा ​प्रमो पाहाच : सलमानने दिली शाहरूखवरच्या प्रेमाची कबुली

हा ​प्रमो पाहाच : सलमानने दिली शाहरूखवरच्या प्रेमाची कबुली

मान खान आणि शाहरूख खान यांच्यातील मतभेद निवळले आहेत. सलमानची बहीण अर्पिताच्या लग्नापासून सलमान-शाहरूख अगदीच जिवलग मित्रासारखे वागू लागले आहेत. ‘बिग बॉस ९’मध्ये शाहरूख कधी नव्हे ते ‘दिलवाले’च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. याठिकाणी सलमानसोबत त्याने अनेक गेम्सही खेळले होते. यानंतर शाहरूखच्या ‘फॅन’ या चित्रपटाचे ट्रेलर सलमानने आपल्या चाहत्यांशी शेअर केले होते. शिवाय मी किंगखानचा खूप मोठा चाहता असल्याचेही सांगितले होते. आता तर सलमानने खुद्द  ‘सुल्तान’मध्येच तशी कबुली दिली आहे. होय, ‘सुल्तान’च्या नव्या प्रमोत सलमान शाहरूखबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे. या प्रमोत सलमान व अनुष्का यांच्यात कुस्ती रंगते. पण सलमान कुस्ती खेळण्यापेक्षा अनुष्काच्या डोळ्यांत गुंग होतो. यावेळी सलमानचा कोच त्याला बचावतो. तू कुस्ती शिकायला आला आहे की रोमान्स करायला. खुद को शाहरूख समजते है के, असे तो सलमानला म्हणतो. यावर सलमान काय म्हणतो माहितीय, ‘शाहरूख का मजाक मत उडाओ. मन्ने बहूत पसंत है. जब वो लडकी के आंख में आंख डालके देखे है ना, तो अंधी लडकी भी पट जावे है..’ सही ना...सलमानच्या तोंडून शाहरूखची ही स्तूती ऐकायची तर हा प्रमो बघा.. 

Web Title: Watching this promo: Salman confesses his love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.