watch video: शाहरुखच्या बर्थडे सेलिब्रेशनची अशी सुरू आहे तयारी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 16:29 IST2018-11-02T16:28:54+5:302018-11-02T16:29:20+5:30
शाहरुख खानच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांत रिलीज होतोय. शाहरुखच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मुंबईच्या वडाला येथील आयॅक्समध्ये ‘झिरो’चा ट्रेलर लॉन्च केला जाणार आहे.

watch video: शाहरुखच्या बर्थडे सेलिब्रेशनची अशी सुरू आहे तयारी!!
शाहरुख खानच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांत रिलीज होतोय. शाहरुखच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मुंबईच्या वडाला येथील आयॅक्समध्ये ‘झिरो’चा ट्रेलर लॉन्च केला जाणार आहे. या इव्हेंटची सुरूवात झालीय. या चित्रपटाचा मेरठशी खास संबंध आहे. यामुळेच, इव्हेंटचा अख्खा सेट मेरठच्या धर्तीवर सजवण्यात आला आहे. अख्ख्या सेटला मेरठच्या स्ट्रिट मार्केटचे लूक देण्यात आले आहे. मेरठचे प्रसिद्ध घंटाघर, फुलांची दुकाने असे सगळे या सेटवर आहे. मेरठचा फिल देणारे जिलेबीवाल्याचे दुकानही याठिकाणी आहे. अख्खे मेरठ डोळ्यांपुढे उभे करणाऱ्या या सेटवरचं ‘झिरो’चा काही तासांत ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. चित्रपटात शाहरुखने बऊआ सिंह साकारलेला आहे. हा बहुआ सिंग आयुष्यात अधुरा आहे आणि हे अधुरेपण दूर करण्यासाठी तो बरेच काही करतो. अगदी मेरठहून थेट न्यूयॉर्कला पोहोचतो. ‘झिरो’पासून त्याचा प्रवास सुरू होतो.
या प्रवासाची झलक ट्रेलरमध्ये आपण पाहुच. तत्पूर्वी ट्रेलर लॉन्चसाठी सजवण्यात आलेल्या सेटचा खास व्हिडिओ...