Watch Video : इंदर कुमारची ‘ही’ मुलाखत बघून सलमान खानसह तुुमच्याही डोळ्यात येतील अश्रू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 22:18 IST2017-07-28T16:48:47+5:302017-07-28T22:18:47+5:30

एक व्हिडीओ सध्या समोर येत असून, त्यामध्ये इंदर ज्या उत्सुकतेने त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती देतो, ते बघून त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

Watch Video: Watching Inder Kumar's 'This' interview with Salman Khan will tear your eyes! | Watch Video : इंदर कुमारची ‘ही’ मुलाखत बघून सलमान खानसह तुुमच्याही डोळ्यात येतील अश्रू !

Watch Video : इंदर कुमारची ‘ही’ मुलाखत बघून सलमान खानसह तुुमच्याही डोळ्यात येतील अश्रू !

लिवूडसाठी आजचा दिवस फारसा चांगला राहिला नाही. कारण इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता इंदर कुमार याचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. इंदरच्या निधनाची ही बातमी पसरताच बॉलिवूडकरांमध्ये हळहळ व्यक्त केली गेली. वास्तविक इंदर कुमारच्या खात्यात खूपच कमी गाजलेले चित्रपट आहेत; मात्र त्यातील काही चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारे आहे. इंदरच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये म्हणजे त्याने बहुतांश चित्रपटांमध्ये सलमान खानसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे इंदरच्या निधनाचे वृत्त सलमानसाठी खूपच धक्कादायक ठरले आहे. असो, इंदरने त्याच्या आगामी चित्रपटाविषयीची माध्यम प्रतिनिधींना माहिती देतानाचा एक व्हिडीओ सध्या समोर येत असून, त्यामध्ये इंदर ज्या उत्सुकतेने त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती देतो, ते बघून त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. 

या व्हिडीओमध्ये सलमानविषयीदेखील इंदर बोलत आहे. खरं तर इंदर आणि सलमानचे नाते खूपच घनिष्ट राहिले आहे. हे दोघेही फुटबॉल खेळण्यासाठी एकत्र जात असत. त्याचबरोबर अनेक पार्ट्यांमध्ये या दोघांना एकत्र बघण्यात आले आहे. इंदर तर सलमानला त्याचा गुरू मानत असे. या व्हिडीओमध्ये सलमानविषयी बोलताना इंदर म्हणतो की, ‘मी सलमानसोबत बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले असून, आगामी काळातही त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. तो माझा भाऊ आहे, माझा गुरू आहे आणि इंडस्ट्रीमधील सगळ्यात मोठा स्टार आहे.’ इंदरचे हे शब्द जेव्हा सलमानच्या कानावर पडणार तेव्हा त्याला अश्रू आवरणे कठीण होईल, हे आम्ही दाव्याने सांगू शकतो. 



त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये इंदर त्याच्या आगामी चित्रपटाविषयीदेखील बोलतो. एका चित्रपटात मी मुख्य भूमिकेत असून, इंदर कुमार हेच पात्र साकारत आहे. इंदर जेव्हा ही माहिती देत असतो, तेव्हा त्याच्या चेहºयावरील उत्साह बघण्यासारखा असतो. कदाचित आगामी काळात रिलीज होणाºया चित्रपटांविषयीच तो माहिती देत असावा. इंदरने दोन चित्रपटांचे काम पूर्ण केले असून, आगामी काळात रिलीज होणारे हे त्याचे अखेरचे चित्रपट असतील. 

Web Title: Watch Video: Watching Inder Kumar's 'This' interview with Salman Khan will tear your eyes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.