Watch Video : रजनीकांत आणि अक्षयकुमार ‘2.0’च्या प्रमोशनसाठी वापरणार हा आगळा-वेगळा फॉर्म्युला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2017 01:24 PM2017-06-24T13:24:03+5:302017-06-24T18:54:20+5:30

​दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार यांचा अपकमिंग मोस्ट अवेडेट चित्रपट ‘२.०’विषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. रजनीकांत आणि अक्षय त्यांच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक वेगळा फॉर्म्युला वापरणार आहेत.

Watch Video: This unique different formula will be used for the promotion of Rajinikanth and Akshay Kumar 2.0. | Watch Video : रजनीकांत आणि अक्षयकुमार ‘2.0’च्या प्रमोशनसाठी वापरणार हा आगळा-वेगळा फॉर्म्युला!

Watch Video : रजनीकांत आणि अक्षयकुमार ‘2.0’च्या प्रमोशनसाठी वापरणार हा आगळा-वेगळा फॉर्म्युला!

googlenewsNext
क्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार यांचा अपकमिंग मोस्ट अवेडेट चित्रपट ‘२.०’विषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. रजनीकांत आणि अक्षय त्यांच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक वेगळा फॉर्म्युला वापरणार आहेत. या चित्रपटाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी रजनी आणि अक्षय वर्ल्ड टूर जाणार आहेत. होय, हे खरं आहे. चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी सध्या या दोघांकडूनही विशेष प्लॅनिंग केले जात असून, त्यानुसार वर्ल्ड टूरचे नियोजन केले जात आहे. सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करून त्यांनी त्यांच्या चाहत्यांना याविषयीची माहिती दिली आहे. 

चित्रपटाचे प्रोड्यूसर राजू महालिंगम यांनी त्यांच्या सोशल साइटवर एक व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘2.0 promotion kick starts……#2point0’ असे लिहिले आहे. हा चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केला जाणार होता. परंतु आता चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून, २५ जानेवारी २०१८ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना माहिती देताना प्रॉडक्शन राजू महालिंगमने सांगितले की, रजनीकांत आणि अक्षय यांच्या ‘२.०’ या चित्रपटाच्या व्हीएफएक्स टेक्नॉलॉजीवर आम्ही विश्वस्तरीय काम करीत आहोत. ज्याकरिता बराचसा वेळ लागण्याची शक्यता आहे. आम्ही प्रयत्नशील होतो की, हा चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिलीज केला जावा, परंतु ते मुश्किल वाटू लागल्यानेच आम्ही रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सध्या आमची सर्व टीम व्हीजुअल इफेक्ट्सवर मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. त्यामुळे हा चित्रपट जगभरात रिलीज करता यावा म्हणूनच २५ जानेवारी २०१८ हा दिवस निवडला आहे. }}}} ">2.0 promotion kick starts......#2point0pic.twitter.com/QiGkQ03b89— Raju Mahalingam (@rajumahalingam) June 24, 2017दरम्यान, ‘२.०’ हा चित्रपट रजनीकांत यांच्याच २०१० मध्ये आलेल्या ‘रोबोट’चा सीक्वल आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर ऐश्वर्या राय-बच्चन लीड रोलमध्ये बघावयास मिळाली होती. या चित्रपटात रजनीकांत यांनीच नायक आणि खलनायकाची भूमिका साकारली होती. यावेळी खलनायकाच्या भूमिकेत अक्षयकुमार दिसणार असून, तो खूपच खतरनाक दाखविण्यात येणार आहे, तर रजनीकांत पुन्हा एकदा डॉक्टर वसीकरण आणि रोबोट चिट्टीच्या भूमिकेत असणार आहेत. 

Web Title: Watch Video: This unique different formula will be used for the promotion of Rajinikanth and Akshay Kumar 2.0.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.