Watch Video : सुष्मिता सेन कमबॅकसाठी तयार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 16:48 IST2017-04-18T11:18:59+5:302017-04-18T16:48:59+5:30
बºयाचशा कालावधीपासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेली अभिनेत्री सुष्मिता सेन पडद्यावर परतण्यासाठी उत्सुक आहे.
Watch Video : सुष्मिता सेन कमबॅकसाठी तयार!!
बºयाचशा कालावधीपासून मोठ्या पडद्यावरून गायब असलेली अभिनेत्री सुष्मिता सेन पडद्यावर परतण्यासाठी उत्सुक आहे. मात्र ती छोट्या पडद्यावर आपल्या सौंदर्याची जादू दाखविणार असल्याने मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी तिच्या फॅन्सना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नुकतेच सुष्मिताने एका कमर्शियल अॅडसाठी शूट केले आहे. सुष यावेळी एका मिनरल अॅडमध्ये दिसणार आहे.
याविषयीची माहिती सुष्मितानेच तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर काही फोटोज् आणि व्हिडिओ शेअर करून दिली आहे. अॅडमध्ये सुष्मिता खूपच सुंदर दिसत आहे. दरम्यान, सुष सध्या चित्रपटांपेक्षा तिच्या मुलींसोबत अधिक वेळ व्यतीत करीत आहे. कारण ती ‘नो प्रोब्लम’ या चित्रपटात अखेरीस बघावयास मिळाली होती. त्यानंतर जणू काही तिने चित्रपटांमधून ब्रेकच घेतला. मात्र या कमर्शियल अॅडच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुष्मिता पडद्यावर झळकत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता तिच्या फॅमिलीसोबत त्यातही दोन मुलींसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना बघावयास मिळाली आहे. मध्यंतरीच्या काळात तिच्या वापसीबाबत चर्चाही रंगली होती. जेव्हा ती गेल्यावर्षी मनीष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीत आपल्या बॉयफ्रेण्डबरोबर आली होती, तेव्हा ती चांगलीच चर्चेत आली होती. कारण तिचा बॉयफ्रेण्ड तिच्या वयाच्या तुलनेत खूपच लहान असल्याचे दिसत होता. सुष्मिताने मोठ्या रुबाबात मनीषच्या पार्टीत एंट्री केली होती. परंतु पार्टीतील लोकांचे जेव्हा तिच्या बॉयफ्रेण्डकडे लक्ष गेले तेव्हा ते सगळेच चकीत झाले.
सुष्मिताची लव्ह लाइफ कधीच लपून राहिली नाही. कारण तिने तिच्या नात्याविषयी कधीच कोणापासून लपविले नाही. सुष्मिता अगोदर हॉटेलिअर ऋतिक भसीन याला डेट करीत होती. मात्र त्याच्यासोबत तिचे नाते फार काळ टिकले नाही. मात्र असे पहिल्यांदाच घडले नाही की, सुष्मिताचे नाव तिच्यापेक्षा लहान वयाच्या मुलासोबत जोडले गेले. कारण २०११ मध्ये आलेल्या बातम्यांनुसार सुष जुहू येथील बिझनेसमॅन इम्तिआज खत्री याला डेट करीत होती. जो तिच्यापेक्षा वयाने खूपच लहान होता. त्यांची भेट गोवा येथे झाली होती. आता पुन्हा एकदा सुष्मिता तिच्यापेक्षा लहान वयाच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे.
दरम्यान, या दोघांच्या प्रेमात पडण्याअगोदर सुष अभिनेता रणदीप हुडा याला डेट करीत होती. त्याच्यासोबत ती खूपच सिरीअस असल्याच्याही बातम्या त्यावेळेस समोर आल्या होत्या. मात्र त्याच्यासोबतचे नातेही कालांतराने संपुष्टात आले. सुषच्या या स्वभावामुळे ती कोणासोबतही नाते कायम ठेवण्याच्या मुडमध्ये दिसत नसल्याचेच स्पष्ट होते. आता या वयाने छोट्या असलेल्या बॉयफ्रेण्डसोबत सुष्मिताचे नाते किती काळ टिकेल हे बघणे मजेशीर ठरेल.