Watch Video : सोनू निगम बनला ढिंचॅक पूजाचा फॅन; कुमार सानूच्या स्टाइलमध्ये गायिले ‘दिलो का शूटर’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 16:02 IST2017-07-12T10:16:26+5:302017-07-12T16:02:44+5:30

​‘सेल्फी मैंने लेली आज’ आणि ‘पिंक स्कूटर’सारख्या गाण्यांमुळे सोशल मीडियात पॉप्युलर झालेल्या ढिंचॅक पूजाच्या युनिक स्टाइलचे आज मोठमोठे गायक चाहते होताना दिसत आहेत.

Watch Video: Sonu Nigam becomes Dinkchak Puja fan; Kumar Sanoo's style song 'Diloo ki shooter'! | Watch Video : सोनू निगम बनला ढिंचॅक पूजाचा फॅन; कुमार सानूच्या स्टाइलमध्ये गायिले ‘दिलो का शूटर’!

Watch Video : सोनू निगम बनला ढिंचॅक पूजाचा फॅन; कुमार सानूच्या स्टाइलमध्ये गायिले ‘दिलो का शूटर’!

ेल्फी मैंने लेली आज’ आणि ‘पिंक स्कूटर’सारख्या गाण्यांमुळे सोशल मीडियात पॉप्युलर झालेल्या ढिंचॅक पूजाच्या युनिक स्टाइलचे आज मोठमोठे गायक चाहते होताना दिसत आहेत. खरं तर हे हास्यास्पदच म्हणावे लागेल. वास्तविक तिची ही स्टाइल भलेही अनेकांना आवडलेली नसेल, परंतु तिला कोणी इग्नोर करीत नाही, हेही तेवढेच खरे आहे. असो, ढिंचॅक पूजाच्या सोशल मीडिया सेन्सेशनच्या फॅन्स लिस्टमध्ये आता गायक सोनू निगम याच्या नावाचा समावेश झाला असून, त्याने तिच्या स्टाइलमध्ये एक गाणं गात त्याचा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. 



सोनू निगमने फेसबुकवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो ढिंचॅक पूजाचे लेटेस्ट गाणे ‘दिलो का शूटर’ गाताना बघावयास मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोनू निगमने लिहिले की, ‘मी रात्रभर याविषयी विचार करीत होतो, मात्र आता मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी सध्या लंडनमध्ये असून, ‘दिलों का शूटर’ हे गाणे कुमार सानूदाच्या स्टाइलमध्ये गाण्याचा प्रयत्न करीत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोनूने हेही सांगितले की, ही आयडिया माझा मुलगा नेवान याला अजिबात आवडलेली नाही. तो याच्या विरोधात होता. मात्र अशातही मी स्वत:ला हे गाणे गाण्यापासून रोखू शकलो नाही.’

">

ढिंचॅक पूजा हिचे सर्व गाणे यू-ट्यूबने कॉपीराइटमुळे काढून टाकले आहेत. मात्र पूजाकडून याविषयी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा खुलासा आलेला नाही. त्यामुळे तिचे गाणे काढून टाकण्याचे नेमके कारण काय? हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. खरं तर ढिंचॅक पूजाची गाणी नेटिझन्सला फारशी पसंत आली नाहीत. मात्र खिल्ली उडविण्यासाठी का होईना, ढिंचॅक पूजाचे गाणे बघितले जात होते. यू-ट्यूबवर तर पूजाच्या चॅनलला तब्बल १.८ लाख लोकांनी सब्सक्राइब केले. ‘सेल्फी मैंने लेली आज’ या गाण्याला तर तब्बल ३० मिलियन व्ह्यूज मिळाले. 

Web Title: Watch Video: Sonu Nigam becomes Dinkchak Puja fan; Kumar Sanoo's style song 'Diloo ki shooter'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.