Watch video: शाहरुख खानचा देसी नाहीतर,परदेशी सिमरन सोबत DDLJ स्टाइल रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 14:48 IST2017-01-24T09:16:01+5:302017-01-24T14:48:40+5:30

'DDLJ'सिनेमाच्या सिन्सप्रमाणे.ट्रेनमध्ये परदेशी महिलेचा ज्यावेळी तोल जातो त्यावेळी तो तिला वाचवतो.शाहरुखची ती पोज तुम्ही अनेक चित्रपटात पाहिली असेल.आता तीच पोज पुन्हा एकदा शाहरूख रूपेरी पडद्यावर नाहीतर एक जाहीरातीत करताना दिसतोय.

Watch video: Shah Rukh Khan's country otherwise, with foreign Simran, DDLJ Style Romance | Watch video: शाहरुख खानचा देसी नाहीतर,परदेशी सिमरन सोबत DDLJ स्टाइल रोमान्स

Watch video: शाहरुख खानचा देसी नाहीतर,परदेशी सिमरन सोबत DDLJ स्टाइल रोमान्स

परस्टार शाहरुख खान सध्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.सिनेमाचे प्रमोशनसाठी शाहरूख नवीन नवीन फंडेही वापरतोय. नुकतेच स्टारडम मिळाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरूखने ट्रेनने मुंबई ते दिल्ली असा प्रवास करत रईस सिनेमाचे प्रमोशन केले.रईसच्या निमित्ताने जिथे पहावे तिथे फक्त आणि फक्त या किंग ऑफ रोमान्सचीच चर्चा होत आहे. आता पुन्हा एकदा त्याचा एक व्हिडीओ व्हायरला झाला आहे.किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानने नुकतेच बंगाल पर्यट विभागासाठी एक जाहिरात शूट केली आहे. यामध्ये त्याचा DDLJ च्या एका सीनची पुनारावृती केलेली आहे. यामध्ये तो परदेशी पर्यटकासोबत रोमान्स करताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशलमीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. 'दिल वाले दुल्हनियाँ ले जायेंगे' या सिनेमात त्याने काजोलसह केलेल्या रोमान्सप्रमाणेच हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.

या जाहिरातीची सुरवात एका बंगाली लग्नापासून होते.लग्नाला आलेली एक मुलगी काळ्या पिवळ्या टॅक्सीमध्ये बंगाल फिरण्यासाठी आलेली असते. यावेळी सर्व बंगालची दिलखुलास सैर दाखवण्यात आली आहे.यामध्ये बंगालची प्रसिद्ध दुर्गापुजाही दाखवण्यात आली आहे.तीन मिनीटाच्या या जाहिरातीत  शाहरुख खानने DDLG स्टाइल रोमान्स केलेला दाखवण्यात आला आहे. चित्रपटात ज्याप्रमाणे काजोल ट्रेन सुटण्याच्या वेळेस धावत येते..तसेच ती परदेशी महिला धावती ट्रेन पकडण्यासाठी पळताना शाहरुख तीला ट्रेन मध्ये येण्यास मदत करतो.डीडीएलजेच्या सिन्सप्रमाणे.ट्रेनमध्ये परदेशी महिलेचा ज्यावेळी तोल जातो त्यावेळी तो तिला वाचवतो.शाहरुखची ती पोज तुम्ही अनेक चित्रपटात पाहिली असेल.आता तीच पोज पुन्हा एकदा शाहरूख रूपेरी पडद्यावर नाहीतर एक जाहीरातीत करताना दिसतोय.

Web Title: Watch video: Shah Rukh Khan's country otherwise, with foreign Simran, DDLJ Style Romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.