WATCH VIDEO : रणवीर सिंह व दीपिका पादुकोण झालेत रोमॅन्टिक! विसरले जगाचे भान!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 10:11 IST2017-08-22T04:40:46+5:302017-08-22T10:11:13+5:30
अगदी काल-परवारणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात दोघेही एकमेकांना किस करताना दिसले होते. आता या फोटोनंतर दोघांचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. या रोमॅन्टिक व्हिडिओबद्दल काय सांगायचे?

WATCH VIDEO : रणवीर सिंह व दीपिका पादुकोण झालेत रोमॅन्टिक! विसरले जगाचे भान!!
र वीर सिंह आणि दीपिका पादुकोण या दोघांमध्ये काय सुरु आहे, नक्की कळायला मार्ग नाही. अधून-मधून त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येतात. या बातम्या दीपिका व रणवीरच्या चाहत्यांचा हिरमोड करतात आणि मग अचानक काही झालेच नाही, अशा थाटात रणवीर व दीपिका दोघेही पुन्हा एकत्र दिसतात. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की काय सुरु आहे, हेच चाहत्यांना कळत नाही. तुम्हीही याच प्रश्नाने गोंधळले असाल तर रणवीर व दीपिका दोघेही एकमेकांसोबत आहे, हेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो. केवळ सोबतच नाही तर दोघेही एकमेकांची कंपनी मस्तपैकी एन्जॉय करताहेत. अगदी काल-परवा रणवीर व दीपिकाचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात दोघेही एकमेकांना किस करताना दिसले होते. आता या फोटोनंतर दोघांचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. या रोमॅन्टिक व्हिडिओबद्दल काय सांगायचे? होय, रणवीर व दीपिका एकमेकांत इतके गुंतले आहेत की, आपल्या आजुबाजूला कॅमेरा आहे, याचे भानही त्यांना नाही. दीपिका अलगद रणवीरच्या मिठीत शिरलेली यात दिसतेय.‘झूम’ने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यातील दीपिका व रणवीरचा रोमॅन्टिक अंदाज पाहून चाहत्यांनी या व्हिडिओच्या ब्रॅकग्राऊंडमध्ये रोमॅन्टिक गाणे टाकून तो अपलोड केला आहे.
ALSO READ : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या ‘या’ फोटोने सोशल मीडियावर खळबळ !
दीपिका व रणवीर सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहेत. खरे तर ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दोघांनाही एकत्र न दिसण्याची ताकीद दिली आहे. दोघांनीही मीडियासमोर एका फ्रेममध्ये येणे टाळा, असेही त्यांना सांगण्यात आले आहे. या ताकीदीनंतर दीपिका व रणवीर दोघेही मीडियासमोर एकत्र येण्याचे टाळतांना दिसत आहेत.पण शेवटी एकांतात या लव्हबर्ड्सला एकत्र येण्यापासून रोखणे खरोखरीच अन्याय होईल. होय ना?
बातमीसोबत आम्ही दीपिका व रणवीरचा हा रोमॅन्टिक व्हिडिओ देत आहोत. तो बघा आणि दीपिका व रणवीर एकमेकांना किती परफेक्ट आहेत, त्याबद्दलच्या तुमच्या भावना आम्हाला नक्की कळवा.