Watch Video : पूनम पांडेने दिल्या होळीच्या HOT शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 19:36 IST2017-03-11T14:06:23+5:302017-03-11T19:36:23+5:30

​बॉलिवूडची इंटरनेट क्वीन म्हणून ओळखल्या जाणाºया पूनम पांडे हिने नेहमीच्या अंदाजात तिच्या फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Watch Video: Poonam Pandey gives Holi HOT wishes! | Watch Video : पूनम पांडेने दिल्या होळीच्या HOT शुभेच्छा!

Watch Video : पूनम पांडेने दिल्या होळीच्या HOT शुभेच्छा!

लिवूडची इंटरनेट क्वीन म्हणून ओळखल्या जाणाºया पूनम पांडे हिने नेहमीच्या अंदाजात तिच्या फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशात कुठलेही निमित्त असो, त्यावर पूनम पांडे चाहत्यांना खास अंदाजात व्हिडीओच्या माध्यमातून गिफ्ट देत असते. असेच व्हिडीओ गिफ्ट तिने होळीच्या निमित्तानेही दिले असून, यामध्ये ती जबरदस्त हॉट दिसत आहे.

खरं तर गेल्या काही दिवसांपासूनच पूनम पांडे होळीनिमित्त चाहत्यांना गिफ्ट देणार असल्याची चर्चा होती. अखेर खास तिच्या शैलीत होळी खेळतानाचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर अपलोड करून धूम उडवून दिली आहे. त्याचबरोबर रंगात रंगलेले काही बिकिनी फोटोही तिने यावेळी अपलोड केले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना एकप्रकारे तिने दुहेरी गिफ्टच दिले आहे. 



पूनमने ट्विटरवर या व्हिडीओची लिंक शेअर करताना लिहिले की, ‘माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटेसे गिफ्ट.’ पूनमच्या या लिंकला त्याच्या चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ यु-ट्यूबवर शेअर होताच सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल केला जात आहे. कारण काही मिनिटांतच हा व्हिडीओ बघणाºयांची संख्या हजारोंच्या घरात होती. 

व्हिडीओमध्ये पूनम रंगांसोबत सेक्सी हावभाव करताना बघावयास मिळत आहे. लाल रंगाची बिकिनी घातलेल्या पूनमच्या या व्हिडीओने सध्या धूम उडवून दिली आहे. खरं तर पूनम नेहमीच अशा प्रकारचे व्हिडीओ शेअर करून तिच्या चाहत्यांना धक्का देत असते. आता पूनमने दिलेल्या या होळीच्या शुभेच्छा तिच्या चाहत्यांना भावल्या नसतील तरच नवल.

Web Title: Watch Video: Poonam Pandey gives Holi HOT wishes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.