watch Video : रिलीजच्या तोंडावर ‘पद्मावती’ वाद सुप्रीम कोर्टात! संजय लीला भन्साळी उतरले मैदानात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 11:53 IST2017-11-09T06:23:08+5:302017-11-09T11:53:08+5:30

राजकीय गोटात चर्चित ‘पद्मावती’ वाद आता सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला आहे. रिलीजच्या तोंडावर वाद असा चिघळत असलेला ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही आपले मौन तोडावे लागले आहे.

Watch Video: 'Padmavati' controversy in Supreme Court for release! Sanjay Leela Bhansali landed on !! | watch Video : रिलीजच्या तोंडावर ‘पद्मावती’ वाद सुप्रीम कोर्टात! संजय लीला भन्साळी उतरले मैदानात!!

watch Video : रिलीजच्या तोंडावर ‘पद्मावती’ वाद सुप्रीम कोर्टात! संजय लीला भन्साळी उतरले मैदानात!!

जय लीला भन्साळींचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या ‘पद्मावती’च्या मार्गातील अडचणी दूर व्हायचे नाव घेत नाहीयेत. करणी सेना आणि राजपूत संघटनांनी या चित्रपटाच्या रिलीजला विरोध चालवला असताना राजकीय पक्षांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. राजकीय गोटात चर्चित हाच वाद आता सर्वोच्च न्यायालयाही पोहोचला आहे. रिलीजच्या तोंडावर वाद असा चिघळत असलेला ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही आपले मौन तोडावे लागले आहे. चित्रपटात राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिल्जी यांच्यावर कुठलाही ड्रीम सीक्वेंस नाही, असा पुनरूच्चार त्यांनी केला आहे. आता भन्साळींच्या या स्पष्टीकरणानंतर ‘पद्मावती’च्या रिलीजच्या मार्गातील अडचणी दूर होतात की नाही, ते आपण बघूच.

भन्साळींचे स्पष्टीकरण



भन्साळींनी एक व्हिडिओ जारी करत, ‘पद्मावती’ वादावर स्पष्टीकरण दिले आहे. मी ‘पद्मावती’ अतिशय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने बनवला आहे. राणी पद्मावतीची कथा मला नेहमीच प्रेरित करत आली आहे. तिचे शौर्य, आत्मबलिदानापुढे मी नतमस्तक होत आलोय. पण काही अफवांमुळे ‘पद्मावती’ला विरोध होत आहे. राणी पद्मावती व अलाऊद्दीन खिल्जी यांच्यावर चित्रपटात कुठलाही प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आलेला नाही. मी याआधीही असे कुठले दृश्य चित्रपटात असल्याचा इन्कार केला आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कुणाच्याही भावना दुखावतील, असे काहीही चित्रपटात नाही. चित्रपट साकारताना आम्ही राजपुत घराणेशाहीची मानमर्यादा राखली आहे, असे त्यांनी या व्हिडिओ म्हटले आहे.


याचिका दाखल
पेशाने वकील असलेले सोमेश चंद्रा झा यांनी ‘पद्मावती’च्या मेकर्सविरोधात एक याचिका दाखल केली  आहे. ‘पद्मावती’त तथ्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप झा यांनी केला आहे. याचिकेनुसार, ‘पद्मावती’विरोधातील संताप वाढतो आहे. चित्रपट रिलीज झालाच तर हे प्रकरण चिघळू शकते. ट्रेलरमध्ये राणी पद्मावतीला नृत्य करताना दाखवले आहे. पण राजघराण्यातील स्त्रिया कधीच असले नृत्य करत नसत. ही ऐतिहासिक तथ्यांसोबत खेळण्याचा प्रकार आहे, असेही झा यांनी म्हटले आहे.

Web Title: Watch Video: 'Padmavati' controversy in Supreme Court for release! Sanjay Leela Bhansali landed on !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.