watch video : ​‘टायगर जिंदा है’च्या सेटवर अचानक इमोशनल का झाली कॅटरिना कैफ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:21 AM2017-09-15T10:21:41+5:302017-09-15T15:51:41+5:30

‘टायगर जिंदा है’चे शूटींग अखेरच्या टप्प्यात आहे. खरे तर शूटींग अखेरच्या टप्प्यात म्हटल्यावर कॅटरिना आनंदी असायला हवी. पण ती झाली इमोशनल.

watch video: Katrina Kaif suddenly got an emotional set on 'Tiger Zinda Hai' | watch video : ​‘टायगर जिंदा है’च्या सेटवर अचानक इमोशनल का झाली कॅटरिना कैफ?

watch video : ​‘टायगर जिंदा है’च्या सेटवर अचानक इमोशनल का झाली कॅटरिना कैफ?

googlenewsNext
े तर नाताळच्या मुहूर्तावर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. त्यामुळे कॅटरिना कैफ आणि सलमान खान या जोडीचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहण्यासाठी आपल्या आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण ही केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक मात्र प्रचंड आतूर आहेत. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. चित्रपटाचे शूटींग अखेरच्या टप्प्यात आहे. खरे तर शूटींग अखेरच्या टप्प्यात म्हटल्यावर कॅटरिना आनंदी असायला हवी. पण ती झाली इमोशनल. विश्वास बसत नाही? तर मग चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफर याच्यासोबतचा कॅटरिनाचा हा व्हिडिओ बघा.



तसे तर कॅटरिना व जफर यांचा हा व्हिडिओ मजेशीर आहे.कॅट व जफर दोघेही मस्तीच्या मूडमध्ये व्हिडिओ शूट करताना दिसताहेत.  कॅटच्या कामाने प्रभावित होऊन आदित्य चोप्राने तिला नवीन गाडी भेट स्वरुपात दिल्याचे जफर या व्हिडिओत सांगताना दिसतो. मग कॅमेरा हळूच मागे फिरतो. अर्थात मागे गाडी नसते तर चॉपर असते. मग कॅट व जफर दोघेही हसायला लागतात. याच मजेशीर संवादादरम्यान चित्रीकरण पूर्ण होण्यास आता काही दिवसच राहिलेत, अशावेळी तुझ्या भावना काय?, असा प्रश्न कॅट जफरला विचारले. यावर हा संपूर्ण प्रवास खूप खास होता. यंदाच्या नाताळमध्ये चित्रपटाच्या रुपाने सर्वांच्या चेह-यावर हास्य असेल, अशी अशा अपेक्षा करूया, असे जफर सांगतो. जफर हे बोलत असतानाच कॅटरिनाचे डोळे अचानक पाणावतात. तिचे ते पाणावलेले डोळे पाहून जफर व्हिडिओ लगेच बंद करतो. 

ALSO READ : सलमान खान व कॅटरिना कैफचा इंटिमेट फोटो होतोय वेगाने व्हायरल ! बघितला नसेल तर इथे बघा!!

सलमान व कॅटरिना ‘एक था टायगर’ हा चित्रपट कबीर खाननेच दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता. ‘टायगर जिंदा है’ हा ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. पण हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे. पाच वर्षांनंतर एकत्र येत असलेल्या सलमान व कॅट या दोघांमधील केमिस्ट्री चित्रपट रिलीज होण्याअगोदरच दिसून येत आहे. सलमानने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, हा चित्रपट त्याच्या ‘एक था टायगर’पेक्षा अधिक जबरदस्त असेल. चित्रपटात प्रचंड अ‍ॅक्शन सीन्स असल्याने प्रेक्षकांना एका नवी अनुभूती मिळेल. ‘टायगर जिंदा है’ची कथा तेथूनच सुरू होणार आहे, ज्याठिकाणी ‘एक था टायगर’ची कथा संपली होती. 

Web Title: watch video: Katrina Kaif suddenly got an emotional set on 'Tiger Zinda Hai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.