watch video : ​माहिरा खानचा ‘डीडीएलजे’ अंदाज तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 14:40 IST2017-02-21T09:10:16+5:302017-02-21T14:40:16+5:30

माहिरा खान कदाचित शाहरूखला अद्यापही विसरू शकलेली नाही. शाहरूख आणि बॉलिवूडच्या आठवणीने कदाचित तिला व्याकूळ केले आहे. माहिराने पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून तरी असेच वाटते.

watch video: Did you watch the 'DDLJ' project of Mahira Khan? | watch video : ​माहिरा खानचा ‘डीडीएलजे’ अंदाज तुम्ही पाहिलातं?

watch video : ​माहिरा खानचा ‘डीडीएलजे’ अंदाज तुम्ही पाहिलातं?

किस्तानी अभिनेत्री माहिरा खान व शाहरूख खान या दोघांचा ‘रईस’ अलीकडेच रिलीज झाला. बॉक्सआॅफिसवर ‘रईस’ने चांगला गल्लाही जमवला. ‘रईस’नंतर शाहरूख आपल्या पुढच्या चित्रपटात बिझी झाला. पण माहिरा खान? माहिरा कदाचित शाहरूखला अद्यापही विसरू शकलेली नाही. शाहरूख आणि बॉलिवूडच्या आठवणीने कदाचित तिला व्याकूळ केले आहे. माहिराने पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून तरी असेच वाटते. या व्हिडिओमध्ये माहिरा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ स्टाईलने बॉलिवूडचे क्षण अनुभवताना दिसतेय. ‘सरसों’च्या फुलांनी लदबदलेल्या शेतात काजोल शाहरूखच्या मिठीत विसावते, तो ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’मधील सीन तुम्हाला आठवत असेलच. माहिरा या व्हिडिओत अशाच काहीशा अंदाजात दिसतेय. अर्थात या व्हिडिओत शाहरूख खान नाहीय. पण फक्त कल्पना करा, या व्हिडिओत माहिरासोबत शाहरूख असता तर? माहिरानेही कदाचित अशीच कल्पना केली असावी.



‘रईस’कडून माहिराला बºयाच अपेक्षा होत्या. मात्र पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याच्या मागणीमुळे माहिराचा बराच अपेक्षाभंग झाला.   भारतात प्रमोशन करण्याची माहिराची बरीच इच्छा होती. पण तिला ते करता आले नाही. याबद्दलचे दु:ख माहिराने जाहिरपणे बोलून दाखवले आहे.  फिनिशिंग लाईनला पोहोचण्याआधी शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेल्या स्पर्धकाप्रमाणे माझी अवस्था झालीय. याचे मला दु:ख आहे, असे माहिरा म्हणाली होती. कदाचित हे दु:ख विसरण्यासाठी माहिरा बॉलिवूडच्या आठवणीत रमताना दिसतेय. 
माहिरा ही पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री आहे. लग्नानंतर तिचे अ‍ॅक्टिंग करिअर सुरु झाले. सुरूवातीला तिने व्हिडिओ जॅकी म्हणून काम केले. यानंतर ‘नीयत’ या पाकी टीव्ही सिरिअलमध्ये ती दिसली. यानंतर माहिराने कधीच मागे वळून पाहिल ेनाही.

Web Title: watch video: Did you watch the 'DDLJ' project of Mahira Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.