Throwback video : मामा सलमान खानच्या गाण्यावर अहिल थिरकतो तेव्हा...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 19:40 IST2018-10-15T19:36:24+5:302018-10-15T19:40:00+5:30
सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अर्पिताचा मुलगा अहिलवर करतो. होय, या मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे.

Throwback video : मामा सलमान खानच्या गाण्यावर अहिल थिरकतो तेव्हा...!!
सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अर्पिताचा मुलगा अहिलवर करतो. होय, या मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. मामा बनल्यापासून सलमान वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. असे काही ‘थ्रोबॅक’ व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील एक व्हिडिओ तर पाहण्यासारखा आहे.
या व्हिडोओमध्ये सलमानने अहिलला मैं हू हिरो तेरा... हे गाणे गावून दाखवतो आहे. त्यानंतर त्याला सुल्तानसारखी फायटिंग शिकवताना दिसतो आहे. यानंतर सुल्तानचे ‘हे सुल्तान’ हे गाणेही गावून दाखवतो आहे. मामाने गायलेले गाणे ऐकून अहिल खूपच खूश झाल्याचेही व्हिडिओत दिसते आहे़.अहिल गतवर्षी ३० मार्चलाएक वर्षाचा झाला. या वाढदिवसासाठी सलमान खास २२ तासांचा प्रवास करून मालदिवला पोहोचला होता.
With Ahil in London over breakfast . pic.twitter.com/1Fwx1vGVFy
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 15, 2017