Watch Teaser : ‘तू चीज बडी है मस्त मस्त’चा पहा टीजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 19:33 IST2017-03-05T14:03:48+5:302017-03-05T19:33:48+5:30
अब्बास मस्तान यांचा आगामी ‘मशीन’ या सिनेमातील बहुचर्चित ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ या गाण्याचा टीजर नुकताच रिलिज करण्यात आला असून, जुन्या गाण्याला दिलेला आधुनिक पंच गाण्याला गुदगुल्या करणारा ठरेल, हे नक्की!

Watch Teaser : ‘तू चीज बडी है मस्त मस्त’चा पहा टीजर
अब्बास मस्तान यांचा आगामी ‘मशीन’ या सिनेमातील बहुचर्चित ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ या गाण्याचा टीजर नुकताच रिलिज करण्यात आला असून, जुन्या गाण्याला दिलेला आधुनिक पंच गाण्याला गुदगुल्या करणारा ठरेल, हे नक्की! दरम्यान, हे संपूर्ण गाणे उद्या म्हणजेच सोमवारी रिलिज केले जाणार असल्याने टीजर बघून संपूर्ण गाणे बघण्याविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असेल, हे नक्की!
youtube link: nV1Lge2IgpE
९० च्या दशकातील ‘मोहरा’ या सिनेमातील अक्षयकुमार आणि रविना टंडन यांनी या गाण्यावर डान्स करून तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. त्यावेळी हे गाणे सुपरहिट ठरले होते. आजही या गाण्याचे बोल कानावर पडले की, ते ऐकावसे वाटतात. मात्र हे पहिलेच जुने गाणे नाही, ज्याचे रिमिक्स प्रेक्षकांपर्यंत पोहचविले आहे. हल्ली रिमिक्सचा जमाना असून, यामध्ये ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ हे रिमिस्क गाणंदेखील तरुणाईला वेड लावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'Tu Cheez Badi Hai Mast Mast' from #Mohra recreated for #Machine... Song launch on Monday... Here's the poster: pic.twitter.com/N2qwDTSzdN
— taran adarsh (@taran_adarsh) March 4, 2017
नुकतेच ‘तम्मा तम्मा, दिल क्या करे, हम्मा हम्मा, ओए ओए’ यांसारख्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. आता त्यात आणखी एका गाण्याची भर पडल्याने प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘मशीन’ या सिनेमात मुस्तफा आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत असून, गाण्यांमध्ये त्यांच्या अदा बघावयास मिळत आहेत. आता प्रेक्षकांना या रिमिक्सच्या पूर्ण गाण्याची आतुरता लागली आहे.