कार्तिक आर्यन आला साराच्या मदतीला धावून, अशी केली तिची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 15:55 IST2020-02-07T15:53:19+5:302020-02-07T15:55:58+5:30
सध्या दोघेही 'लव्ह आजकल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रमोशन करताना पाहायला मिळतायेत.

कार्तिक आर्यन आला साराच्या मदतीला धावून, अशी केली तिची मदत
सगळीकडे सध्या कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्याच जास्त चर्चा आहेत. तसेच त्यांच्यात मैत्रीच व्यतिरिक्त प्रेमाचेही नाते फुलत असल्याच्या चर्चा आहेत.एकमेकांना ते डेट करत असल्याचे बोलले जाते. सिनेमाच्या शूटिंगमधून वेळात वेळ काढून दोघे एकत्र वेळ एन्जॉय करतात. तसेच कार्तिक साराबाबत जरा जास्तच पझेसिव्ह असल्याचंही वेळोवेळी पाहायला मिळालं. सध्या दोघेही 'लव्ह आजकल' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रमोशन करताना पाहायला मिळतायेत.
या दोघांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून चाहतेही मोठ्या संख्येने जमतात. नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या प्रमोशन इव्हेंटमध्ये या दोघांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तिथून बाहेर पडताना मात्र त्यांच्या बरोबर फोटो काढता यावा यासाठी अतिउत्साहीत झाले होते. साराला तिच्या चाहत्यांनी गरडा घातला. तिथून बाहेर पडणं कठीण जात होतं अशात कार्तिक तिच्या मदतीला धावून आला आणि तिचा बॉडीगार्ड होत त्यानं तिला या गर्दीतून बाहेर निघण्यास मदत केली.
यातच सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी कार्तिकला व्हॅलेंटाइन डेच्या प्लानबद्दल विचारले. तेव्हा कार्तिकच्या आधी या प्रश्नाचं उत्तर सारानं दिलं. सारा म्हणाली उत्तर तर इथे आहे, 'लव्ह आज कल' पाहणार आहे अजून काय करणार. हाच प्रश्न कार्तिकला पुन्हा एकदा विचारण्यात आल्यावर सारानं त्याला तोडत मध्येच म्हटलं, तो येणार नाही का? त्याला तुम्ही असं का विचारत आहात. त्यानंतर कार्तिककडे वळून त्याला विचारते, नाही येणार का तू? त्यावर कार्तिक म्हणतो, एकत्र? आपण दोघं डेटवर जाणार का? यावर सारा म्हणते. आपला सिनेमा आहे. माझ्यासोबत नाही तर कोणासोबत जाणार. त्यांच्या या म्हणण्यावर सर्व हसू लागतात.