हृतिक रोशनचा 'वॉर २' अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला, कुठे पाहाल? घ्या जाणून…
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:30 IST2025-10-09T15:07:41+5:302025-10-09T15:30:04+5:30
हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांचा 'वॉर २' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

हृतिक रोशनचा 'वॉर २' अखेर ओटीटीवर प्रदर्शित झाला, कुठे पाहाल? घ्या जाणून…
बॉलिवूडमध्ये आठवड्याला नवा चित्रपट येतो, पण काही चित्रपट असे असतात, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अशाच एका जबरदस्त चित्रपटांपैकी एक म्हणजे 'वॉर २'. अभिनेता हृतिक रोशन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट थिएटरनंतर आता थेट घरी बसल्या पाहता येणार आहे.
'वॉर २' हा चित्रपट १४ ऑगस्टला जगभरात प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत झळकली. हा चित्रपट अयान मुखर्जी यांनी बनवला होता आणि त्याची निर्मिती वायआरएफने केली होती. हा चित्रपट आज ९ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ज्यांनी 'वॉर २' थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी हा सिनेमा ओटीटीवर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
'वॉर २' या चित्रपटाची कथा पहिला भाग अर्थात 'वॉर' या चित्रपटाची कथा जेथे संपते तेथून नवीन कहाणीला सुरुवात होते. 'वॉर २' हा चित्रपट YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. विशेष म्हणजे 'वॉर २' चित्रपटाच्या शेवटी स्पाय युनिव्हर्सचा पुढील चित्रपट 'अल्फा'ची सुद्धा घोषणा झाली आहे. 'अल्फा'मध्ये अभिनेता बॉबी देओल खलनायक म्हणून झळकणार आहे. तर अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी वाघ या अभिनेत्री मुख्य भुमिकेत पाहायला मिळतील. तो २५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.