​वाणी कपूरचा ‘लव्ह मेसेज’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 10:47 IST2016-04-19T05:15:12+5:302016-04-19T10:47:32+5:30

वाणीने स्वत:चा ‘लव्ह लॉक’ पुलावर स्वत:चा फोटो चाहत्यांशी शेअर केला.

Wani Kapoor's 'Love Message' | ​वाणी कपूरचा ‘लव्ह मेसेज’

​वाणी कपूरचा ‘लव्ह मेसेज’

िलवाले दुल्हनियां ले जाएंगे’, ‘मोहब्बते’ आणि ‘रब ने बना दी जोडी’ यांसारख्या सुपरडूपर हीट चित्रपटांचा दिग्दर्शक आदित्य चोपडा यावर्षी ‘बेफिक्रे’द्वारे पुनरागमन करतोय.

यशराज फिल्म्सचा ‘बॉस’ आदित्य चोपडा दिग्दर्शन करणार म्हटल्यावर संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे. रणवीर सिंग व वाणी कपूर ही जोडी सध्या फ्रान्सची राजधानी आणि ‘सिट आॅफ लव्ह’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पॅरिस शहरात शुटिंग करत आहे.

वाणीने काल आयफेल टॉवरचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. नंतर तिने स्वत:चा ‘लव्ह लॉक’ पुलावर स्वत:चा फोटो चाहत्यांशी शेअर केला. या फोटोसोबत तिने दिलेले कॅप्शन लक्षवेधक आहे. तिने लिहिले की, ‘पे्रमाला कुलुपबंद नका करू. प्रेमाला मुक्तपणे उडू द्या, वाढू द्या.’

यावरून तर वाणी-रणवीर एकदम ‘बेफिक्रे’ पे्रमीयुगुल असणार असे दिसतेय. आणि तसेही चित्रपटाचे पहिले पोस्टर पाहून तर ते सिद्धच झाले आहे म्हणा.

Web Title: Wani Kapoor's 'Love Message'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.