​‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करणा-यांनो आधी हे पोस्टर बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 15:04 IST2017-04-09T04:22:19+5:302017-04-09T15:04:11+5:30

बॉलिवूडची ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर या दोघांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे ट्रेलर उद्या बुधवारी ...

Waiting for the trailer of 'Half Girlfriend', first see this poster! | ​‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करणा-यांनो आधी हे पोस्टर बघा!

​‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करणा-यांनो आधी हे पोस्टर बघा!

लिवूडची ‘आशिकी गर्ल’ श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर या दोघांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे ट्रेलर उद्या बुधवारी रिलीज होणार आहे. पण तोपर्यंतची उत्सुकता थोपवून धरायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी या चित्रपटाचे एक खास पोस्टर घेऊन आलो आहोत. या पोस्टरद्वारे ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या ट्रेलरबद्दलची आमच्या वाचकांची उत्सुकता  थोपवून धरण्याचे आमचे प्रयत्न आहेत. (अर्थात हे पोस्टर पाहिल्यानंतर काहींची उत्सुकता शिगेलाही पोहोचू शकतेच.)   ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या या खास पोस्टरमध्ये श्रद्धा आणि अर्जुन एकमेकांना किस करताना दिसत आहेत. ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या ट्रेलरमध्येही श्रद्धा व अर्जुनचा हा किस सीन दिसणार आहे.
या पोस्टरमध्ये श्रद्धा व अर्जुन दोघेही परस्परांमध्ये अगदी हरवून गेलेले दिसत आहेत. अर्जुनने यापूर्वी ‘२ स्टेट्स’ या चित्रपटात अनेक किस सीन्स दिले होते. श्रद्धाही अलीकडे आलेल्या ‘ओके जानू’ या चित्रपटात आदित्य राय कपूरला किस करताना दिसली होती. अर्थात अर्जुन व श्रद्धा हे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा आॅनस्क्रील लिपलॉक करताना दिसणार आहेत. 
 


 ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा अर्थ नेमका काय, हे जाणून घ्यायचे असेल तर उद्या जारी होणारा ट्रेलर आपण बघायलाच हवा. चित्रपटाच्या टीजरमध्ये अर्जुन स्वत:  ‘हाफ गर्लफ्रेन्ड’चा अर्थ काय? असा प्रश्न करताना दिसला होता. कदाचित  ‘हाफ गर्लफ्रेन्ड’च्या ट्रेलरमध्ये या प्रश्नाचे उत्तर दडलेले असावे. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट एकता कपूर व शोभा कपूर यांची निर्मिती आहे. येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे.   बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात श्रद्धा प्रथमच काम करते आहे. याऊलट अर्जुनची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित ‘२ स्टेट्स’मध्ये अर्जुन दिसला होता. 

Web Title: Waiting for the trailer of 'Half Girlfriend', first see this poster!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.