प्रतीक्षा संपली! ‘ए जेंटलमॅन’चे ‘डिस्को डिस्को साँग’ आले!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 14:36 IST2017-07-20T09:06:28+5:302017-07-20T14:36:28+5:30
प्रेक्षकांची प्रतीक्षा संपलीय. होय, ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटातील ‘डिस्को डिस्को सॉन्ग’ आज रिलीज झाले.

प्रतीक्षा संपली! ‘ए जेंटलमॅन’चे ‘डिस्को डिस्को साँग’ आले!!
प रेक्षकांची प्रतीक्षा संपलीय. होय, ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटातील ‘डिस्को डिस्को सॉन्ग’ आज रिलीज झाले. गेल्या काही दिवसांपासून या गाण्याची बरीच चर्चा होती. सिद्धार्थ मल्होत्रा व जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटातील लीड जोडीने या गाण्याला प्रमोट करण्यात कुठलीही कसर सोडली नव्हती. आज हे गाणे रिलीज झाले आणि सोबत सिद्धार्थ व जॅकची पडद्यावरची हॉट केमिस्ट्रीही आपल्यापुढे आली. गाण्यात सिद्धार्थने व्हाईट कलरचे जॅकेट घातले आहे. ब्लॅक कलरच्या जीन्ससोबत त्याने ते टीम अप केलेय. त्याच्या या जॅकेटवर गोल्डन कलरचे स्टार्स बनले आहेत. हे स्टार्स आपल्याला ८० दशकाची आठवण करून देतात. जॅकलिन या गाण्यात शॉर्ट स्कर्टमध्ये दिसेतय. अर्थात नेहमीसारखी एकदम हॉट.
२ मिनिट ३२ सेकंदाच्या या गाण्यात सिद्धार्थ व जॅकने तुफान डान्स केला आहे. सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणे शेअर केले आहे. सचिन- जिगर जोडीने या गाण्याला संगीत दिले आहे. तर वायुने गाण्याचे बोल लिहिले आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाचे टीजर ङ्म अनेक पोस्टर्स रिलीज झालेत. या सगळ्यांना प्रेक्षकांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. ‘ए जेंटलमॅन’च्या या गाण्याला किती प्रतिसाद मिळतो, ते बघायचेय. अॅक्शन व कॉमेडीची भरमार असलेला राज निदिमोरू आणि कृष्णा डीके दिग्दर्शित हा चित्रपट आॅगस्टअखेरिस रिलीज होतो आहे. सिद्धार्थ व जॅकलिनशिवाय या चित्रपटात सुनील शेट्टी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तूर्तास सिद्धार्थ ‘इत्तेफाक’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. हा चित्रपट १९६९ मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा रिमेक आहे.