'केजीएफ चॅप्टर २'च्या टीझरची प्रतीक्षा संपली, या दिवशी सुपरस्टार यश देणार चाहत्यांना सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 18:31 IST2020-12-09T18:31:25+5:302020-12-09T18:31:47+5:30
अभिनेता यश या दिवशी 'केजीएफ चॅप्टर २' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करून आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे.

'केजीएफ चॅप्टर २'च्या टीझरची प्रतीक्षा संपली, या दिवशी सुपरस्टार यश देणार चाहत्यांना सरप्राईज
'केजीएफ: चॅप्टर १'मध्ये सुपरस्टार यशच्या विस्मयकारक प्रदर्शनाने थक्क झाल्यानंतर त्याचे चाहते 'केजीएफ: चॅप्टर २' मध्ये त्यांच्या लाडक्या रॉकी भाईची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘केजीएफ: चॅप्टर २’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून त्याच्यासमोर अभिनेता संजय दत्त असणार आहे. सध्या यश केजीएफ चॅप्टर २ चित्रपटात व्यग्र आहे. यशचा चित्रपट केजीएफ चॅप्टर २ हा २०२१ चा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.
केजीएफ २मध्ये दक्षिण आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाची चाहत्यांना बरीच प्रतीक्षा आहे. हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाची अनेक पोस्टर्स समोर आली आहेत. ज्यात अभिनेता यश आणि संजय दत्त तसेच अभिनेत्री रवीना टंडन यांचा लूक समोर आला आहे. पोस्टर समोर आल्यानंतर चाहते ट्रेलर व टीझरची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
केजीएफ चॅप्टर २ चित्रपटाचा टीझर जानेवारीत स्वतंत्रपणे प्रदर्शित होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यश आणि त्याची टीम ८ जानेवारीला चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची योजना आखत आहेत. ८ जानेवारीचा दिवस खूप खास आहे कारण हा अभिनेता यशचा वाढदिवसही आहे.
या दिवशी अभिनेता यश केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करून आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. जर आपण केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाबद्दल बोललो तर त्यात संजय दत्त, रवीना टंडन, यश यांच्यासारखे मुख्य कलाकार मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटात संजय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.