हॉलिवूडपटाला ‘बप्पी दा’चा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 18:55 IST2016-11-02T18:55:10+5:302016-11-02T18:55:10+5:30
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना हॉलिवूडकडे मोर्चा वळवला असताना आता याच मालिकेत आणखी एका कलाकाराचे नाव सामील झाले आहे. संगीतकार ए.आर. ...

हॉलिवूडपटाला ‘बप्पी दा’चा आवाज
या वृत्ताला डिज्नेच्या वतीने दुजोरा देण्यात आला आहे. डिज्ने इंडियाच्या उपाध्यक्ष अमृता पांडे म्हणाल्या, लोकांना त्यांच्याशी जोडणारी एखादी गोष्ट त्या चित्रपटात असेल तर ती त्यांना अधिक आकर्षित करते असा आमचा विश्वास आहे. जंगल बुकचे गाणे आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले, या गाण्यांना चांलगी प्रसिद्धी मिळाली. हीच मालिका आम्ही कायम राखू इच्छितो. चित्रपटाचा आनंद कायम राहावा हा यामागील उद्देश होता. यामुळे आमच्या आगामी चित्रपटासाठी आम्ही बप्पीदाची निवड के ली. त्यांनी माओनामधील एका गाण्याला व टमाटोआ या पात्राला आपला आवाज दिला आहे. हे गीत गायल्याचा आनंद त्यांना आहे. त्यांचा आवाज या पात्रासाठी परफेक्ट होता. भारतात सर्वत्र त्यांचे चाहते आहेत. माओनासाठी ते देखील उत्सुक होते, हा चित्रपट अॅडव्हेंचर जर्नीवर आधारित आहे.
या चित्रपटाला आपला आवाज दिल्यावर बप्पी दा आनंदी असून ते म्हणाले, मी नव्या गोष्टी करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो, मी पहिल्यांदाच एका अॅनिमेटेड चित्रपटासाठी डबिंग केली आहे. हे करीत असताना मला फार मजा आली. ‘माओना’मधील टमाटोआ हे कॅरेक्टर माझ्याशी मिळते जुळते आहे. या चित्रपटासाठी गाणे माझ्यासाठी ‘गोल्डन मेमरीज’ आहेत.