व्हीजे अनुषा दांडेकरला वाढदिवसाचं सरप्राईज, बॉयफ्रेंडने ने दिलं हे स्पेशल गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 16:52 IST2019-01-10T16:48:45+5:302019-01-10T16:52:48+5:30
प्रसिद्ध व्हीजे आणि होस्ट अनुषा दांडेकर हिनं नुकतंच आपला वाढदिवस साजरा केला. अनुषाचा वाढदिवस आणि हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी ...

व्हीजे अनुषा दांडेकरला वाढदिवसाचं सरप्राईज, बॉयफ्रेंडने ने दिलं हे स्पेशल गिफ्ट
प्रसिद्ध व्हीजे आणि होस्ट अनुषा दांडेकर हिनं नुकतंच आपला वाढदिवस साजरा केला. अनुषाचा वाढदिवस आणि हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राने स्पेशल प्लानिंग केलं होतं. गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त करण कुंद्राने अनुषाला खास गिफ्ट दिलं. स्वतः अनुषाने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे. अनुषाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून करणने अनुषाचा वाढदिवस स्पेशल व्हावा यासाठी सारं काही केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोत अनुषा-करण या कपलसह अनुषाचे कुटुंबीयसुद्धा दिसत आहेत.
अनुषाने याबाबतचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे. “वाढदिवसाचा दिवस कुटुंबीयांसह साजरा करण्यास मिळावं यासारखा दुसरा आनंद जगात नाही. त्यांच्याशिवाय वाढदिवसाचं आनंद अपूर्ण आहे. यावेळी एका खोलीत सारं कुटुंब एकत्र होतं. वर्षातून एकदा तरी असं व्हायलाच हवं” अशा शब्दांत अनुषाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या स्पेशल सरप्राईजसह करणने आपल्या लेडी लव्ह अनुषाला आणखी एक सरप्राईज दिले आहे. त्याने अनुषाचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. “जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू सगळ्यात वेगळी आहेस जी माझ्या आयुष्यात खूप सारा आनंद घेऊन येते. तुझ्या साऱ्या मनोकामना पूर्ण होवो अशा शब्दांत करणने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.