Masaba Gupta Wedding : लेकीच्या लग्नात आले व्हिव्हियन रिचर्ड्स, photo व्हायरल, मसाबा म्हणते, 'पहिल्यांदाच पूर्ण कुटुंब..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:27 IST2023-01-27T14:24:40+5:302023-01-27T14:27:26+5:30
बऱ्याच वर्षांनंतर नीना गुप्ता, मसाबा आणि तिचे वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा एकत्रित फोटो दिसला आहे.

Masaba Gupta Wedding : लेकीच्या लग्नात आले व्हिव्हियन रिचर्ड्स, photo व्हायरल, मसाबा म्हणते, 'पहिल्यांदाच पूर्ण कुटुंब..'
अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांची मुलगी मसाबा गुप्ता (Masaba Gupta) आज लग्नबंधनात अडकली. मसाबा प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. हे तिचे दुसरे लग्न आहे.अभिनेता सत्यदीप मिश्राशी (Satyadeep Mishra) तिने आज गुपचुप लग्नगाठ बांधली. या प्रायव्हेट लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील एका फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बऱ्याच वर्षांनंतर मसाबा आणि तिचे वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा एकत्रित फोटो दिसला आहे. विशेष म्हणजे यात नीना गुप्ता आणि त्यांचे पती विवेक मेहरा देखील आहेत. नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स अनेक वर्षांनंतर एकत्र दिसले आहेत त्यामुळे चाहत्यांची नजर त्यांच्यावरच खिळली आहे. मसाबाने तीन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत सर्व कुटुंब एकत्र दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत मसाबाने वडील व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. मसाबा लिहिते, 'पहिल्यांदाच माझं पूर्ण कुटुंब एकत्रित आलं आहे. हे आम्ही आहोत. माझं सुंदर कुटुंब आहे. इथून पुढे आता सगळं चांगलंच होणार आहे.
मसाबाच्या या फोटोंवर सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत.मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केलं होतं. २०१८ मध्ये दोघांनी घटस्फोटोसाठी अर्ज केला आणि २०१९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
कोण आहे मसाबाचा पती सत्यदीप मिश्रा?
सत्यदीप मिश्रा याचं ही हे दुसरं लग्न आहे. अभिनेत्री राव हैदरी ही त्याची पहिली पत्नी. २०१३ मध्ये सत्यदीप व अदितीचा घटस्फोट झाला. नो वन किल्ड जेसिका या सिनेमातून सत्यदीपने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'मसाबा मसाबा'च्या या नेटफिक्सवरच्या शोच्या सेटवर मसाबा व सत्यदीप यांची झाली होती. यात सत्यदीपने मसाबाच्या पूर्वाश्रमीच्या पतीची भूमिका साकारली होती. सत्यदीप हा अभिनेता असला तरी तो वकीलही आहे. 'मसाबा मसाबा' सेटवर मसाबा व सत्यदीप यांची मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली.