‘सौदागर’चा ‘हा’ चॉकलेट हिरो इतका बदलला! फोटो पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 08:00 AM2022-08-09T08:00:00+5:302022-08-09T08:00:02+5:30

Vivek Mushran : एका सिनेमानं एका रात्रीत स्टार झालेले आणि तितक्याच अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब झालेले अनेक स्टार्स आहेत. असाच एक स्टार म्हणजे विवेक मुशरान. होय, ‘सौदागर’ चित्रपटातील तोच तो चॉकलेटी हिरो...

vivek mushran birthday saudagar actor look has changed latest photo | ‘सौदागर’चा ‘हा’ चॉकलेट हिरो इतका बदलला! फोटो पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

‘सौदागर’चा ‘हा’ चॉकलेट हिरो इतका बदलला! फोटो पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!

googlenewsNext

एका सिनेमानं एका रात्रीत स्टार झालेले आणि तितक्याच अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब झालेले अनेक स्टार्स आहेत. असाच एक स्टार म्हणजे विवेक मुशरान (Vivek Mushran). होय, ‘सौदागर’ चित्रपटातील तोच तो चॉकलेटी हिरो. आज या चॉकलेटी हिरोला पाहाल तर थक्क व्हाल. होय, गेल्या काही वर्षांत विवेक मुशरान कमालीचा बदलला आहे. इतका की, त्याला ओळखणंही कठीण व्हावं.
1991 साली विवेकने ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याचा निरागस चेहरा आणि जबरदस्त अभिनयाने तो एका रात्रीत स्टार झाला. यानंतर त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली. पण एकवेळ अशीही आली की, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकेनासे झालेत आणि या हिरोवर साईड रोल करण्याची वेळ आली. आज विवेक मुशरानची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आज (9 ऑगस्ट) त्याचा वाढदिवस.

‘सौदागर’ चित्रपटात विवेक आणि मनीषा कोईराला यांच्यावर चित्रीत ‘ईलू ईलू’ हे गाणं सुपरडुपर हिट झालं होतं. पण या चित्रपटानंतर विवेकच्या आयुष्याने अशी काही कलाटणी घेतली की, त्याला काम मिळणं कठीण झालं.

‘सौदागर’ सुपरहिट झाल्यानंतर विवेकने एका वर्षात तीन चित्रपट केलेत. पण या चित्रपटांना ‘सौदागर’सारखं यश मिळू शकलं नाही आणि विवेकचे स्टारडम धोक्यात आलं.  यानंतर अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला.

2000 मध्ये ‘अंजाने’ या चित्रपटातून त्याने कमबॅक केलं. पण तोही फ्लॉप ठरला. नाही म्हणायला अलीकडे आलेल्या तमाशा, पिंक, बेगम जान, वीरे दी वेडिंग या चित्रपटात तो झळकला. पण त्याच्या वाट्याला अगदीच छोट्या भूमिका आल्यात. चित्रपट फ्लॉप होऊ लागल्यानंतर विवेकने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. सोनपरी, परवरिश, निशा और उसके कजिन्स या मालिकेत त्याने काम केलं.

एकेकाळी लीड हिरो म्हणून दिसणारा विवेक आज स्क्रीन कणी वडिलांच्या तर कधी सहाय्यक भूमिका साकारतो आहे. विशेष म्हणजे, त्याच्याच वयाचे अनेक अभिनेते आजही चित्रपटात लीड रोल साकारत आहेत. पण विवेकचे स्टारडम कधीच संपलं आहे. गत 28 वर्षांत त्याच्या लूकमध्येही मोठा बदल झाला आहे.

Web Title: vivek mushran birthday saudagar actor look has changed latest photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.