मोठ्या वादविवादानंतर 'द काश्मीर फाइल्स'वर येणार नवी वेबसीरिज, विवेक अग्निहोत्रींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:28 IST2023-07-19T16:22:56+5:302023-07-19T16:28:45+5:30

'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' असं विवेक अग्निहोत्रींच्या वेब सीरिजचं नाव असणार आहे.

vivek agnihotri released the kashmir unreported web series after the kashmir files movie | मोठ्या वादविवादानंतर 'द काश्मीर फाइल्स'वर येणार नवी वेबसीरिज, विवेक अग्निहोत्रींची घोषणा

मोठ्या वादविवादानंतर 'द काश्मीर फाइल्स'वर येणार नवी वेबसीरिज, विवेक अग्निहोत्रींची घोषणा

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला 'द काश्मीर फाइल्स' हा बॉलिवूड चित्रपट अनेक कारणांमुळे चर्चेत होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटानंतर आता अग्निहोत्री काश्मीर फाइल्सवरची वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' असं वेब सीरिजचं नाव असून याचा प्रोमो व्हिडिओ त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

"दहशतवाद्यांना पाठिंबा देणार आमि देशाच्या विरोधकांकडून द काश्मीर फाइल्सवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. आता तुमच्यासमोर असं सत्य घेऊन येत आहे, ज्यावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. रडण्यासाठी तयार राह," असं अग्निहोत्रींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' ही वेब सीरिज झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

"माझी वनी आयुष्यभर...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातसाठी नम्रताची खास पोस्ट

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गीगी हदीदला अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट मार्च २०२२मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आलं होतं. या चित्रपटात अनुपम खेर, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर, मिथून चक्रवर्ती, दर्शन कुमार या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: vivek agnihotri released the kashmir unreported web series after the kashmir files movie