बेफिक्रेगर्ल वाणी कपूर दिसणार विशाल भारव्दाज यांच्या चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 12:40 IST2018-01-31T07:10:22+5:302018-01-31T12:40:22+5:30

बेफिक्रे गर्ल वाणी कपूरला सध्या चांगले दिवस आले आहेत. वाणी लवकरच दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या ...

Vishal Bharadwaj's film will be seen by Bachchigarlal Vani Kapoor? | बेफिक्रेगर्ल वाणी कपूर दिसणार विशाल भारव्दाज यांच्या चित्रपट?

बेफिक्रेगर्ल वाणी कपूर दिसणार विशाल भारव्दाज यांच्या चित्रपट?

फिक्रे गर्ल वाणी कपूरला सध्या चांगले दिवस आले आहेत. वाणी लवकरच दिग्दर्शक विशाल भारव्दाज यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असणार आहे. वाणी ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत अॅक्शन करताना दिसणार असल्याचे गतवर्षी कळले होते. 
 
डीएनएच्या रिपोर्टनुसार विशाल भारव्दाज यांना वाणी कपूर आवडली आहे. शुद्ध देसी रोमांस आणि बेफिक्रेमध्ये अभिनय केलेल्या वाणीमध्ये काही तरी वेगळे असल्याचे विशाल यांना वाटते. मात्र अजून या चित्रपटासंबंधी विशाल यांच्याकडून फायनल आऊटपुट आलेले नाही.   

विशाल भारव्दाज सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहेत. ज्यात दीपिका पादुकोण आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. रहिमा खान नावाची लेडी डॉन सपना दीदीच्या नावाने फेमस होती. रहीमाने आपल्या नवऱ्याच्या खूनचा बदला घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मारण्याचा प्लॉन आखला होता. मात्र यात तिचाच मृत्यू झाला. चित्रपटात रहिमाची भूमिका दीपिका पादुकोण साकारणार आहे. तर  मिळालेल्या माहितीनुसार इरफान त्याच्या या आगामी चित्रपटात डॉनची भूमिका साकारणार आहे. दीपिका पादुकोणचा आगामी चित्रपट 'सपना दीदी'मध्ये अभिनेता इरफान खान कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत दिसणार आहे. इरफानने याआधी अनेकवेळा डॉनच्या भूमिका केल्या आहेत पण पहिल्यांदाच तो मोठ्या पडद्यावर दाऊदची भूमिका करतो आहे. 

काही दिवसांपूर्वी वाणीने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ‘बत्ती गुल, मीटर चालू’ मिळाला होता. चित्रपटाचे कामही सुरु झाले होते. पण वाणीने अचानक नकार दिला.  वाणीच्या या नकारामागचे कारण कळू शकले नाही. पण वाणी गेल्याने दिग्दर्शकाची ऐनवेळी पंचाईत झाली. कारण वाणी गेल्यामुळे तिच्याजागी नवी हिरोईन शोधणे आलेच. अर्थात यासाठी नारायण सिंग यांना फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. कारण वाणीने सोडताच श्रद्धा कपूरने या चित्रपटासाठी होकार दिला. यात मुख्य भूमिकेत शाहिद कपूर दिसणार आहे. 

Web Title: Vishal Bharadwaj's film will be seen by Bachchigarlal Vani Kapoor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.