विराट कोहली करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, ही आहेत त्यामागील कारणे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 18:55 IST2017-12-12T13:25:24+5:302017-12-12T18:55:24+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विवाह केला. मीडिया आणि चाहत्यांच्या गर्दीपासून ...

विराट कोहली करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, ही आहेत त्यामागील कारणे!
भ रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विवाह केला. मीडिया आणि चाहत्यांच्या गर्दीपासून दूर जात इटलीमध्ये या दोघांनी लगीनगाठ बांधली. या लग्नात दोन्ही परिवारातील सदस्य आणि त्यांचे मोजकेच मित्र उपस्थित होते. लग्न समारंभ पार पडताच विराट आणि अनुष्काने त्यांच्या चाहत्यांना याबाबतची बातमी दिली. परंतु दोघांच्या लग्नाची चर्चा येथेच संपली नाही, तर आता एक वेगळीच चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. होय, क्रिकेटच्या मैदानावर आपली जादू दाखविणारा विराट लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक ज्या पद्धतीने विराट आणि अनुष्काने स्वत:च्या लग्नाचे ब्रॅण्डिंग केले आहे, त्यावरून अशाप्रकारची चर्चा रंगणे रास्त आहे.
त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर मोस्ट स्टायलिश आणि अॅग्रेसिव्ह दिसणारा विराट खरोखरच बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार काय? अनुष्काच्या सांगण्यावरून तो बॉलिवूडमध्ये काम करणार काय? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. वास्तविक एका अभिनेत्यामध्ये ज्या गोष्टी असतात, त्या सर्व विराटमध्ये आहेत. तो हॅण्ड्स, स्मार्ट, गुडलुकिंग, फिट, डॅशिंग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. याशिवाय तो केवळ चांगले गातच नाही तर, चांगला डान्सही करतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये आपले करिअर बनविल्यानंतर विराट बॉलिवूडमध्ये नवी पारी सुरू करू शकतो.
शिवाय बॉलिवूडमध्ये करिअर करणे म्हणजे अभिनेता बनने असा अर्थ होत नाही. तर विराट बॉलिवूडमध्ये अन्य क्षेत्रात काम करू शकतो. जसे की, अनुष्का शर्माचे प्रॉडक्शन हाउस असून, त्याअंतर्गत तो चित्रपट निर्मिती क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करू शकतो. अनुष्का गेल्या काही काळापासून अभिनयाबरोबरच चित्रपट निर्मितीतही नशीब आजमावत आहे. अनुष्काने ‘एनएच १०’मधून तशी चुणूकही दाखवून दिली. त्यानंतर २०१७ मध्ये आलेल्या ‘फिल्लोरी’चीही तिने निर्मिती केली.
![]()
सूत्रानुसार, ‘फिल्लोरी’मध्ये त्यावेळी विराटने गुंतवणूकही केली होती. मात्र या वृत्ताला अनुष्काने निराधार म्हटले होते. परंतु आता हे दोघे पती-पत्नी झाले असून, आगामी काळात विराट निर्मिती क्षेत्रात उडी घेऊ शकतो. त्याचबरोबर निर्माता करण जोहर याच्यासोबत विराट कोहली एका प्रोजेक्टवर काम करीत असल्याचीही चर्चा गेल्या काही काळापासून रंगत आहे. अशात विराटने बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यास नवल वाटू नये.