विराट कोहलीने या क्रिकेटरजवळ सर्वात आधी दिली होती अनुष्का शर्मासोबतच्या प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 12:37 IST2017-11-06T07:07:01+5:302017-11-06T12:37:01+5:30

विराट आणि अनुष्का नेहमीच आपल्या नात्याला घेऊन चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी तर दोघांनी एक अॅडसाठी शूट देखील केले होते. ...

Virat Kohli was the first to confide with Anushka Sharma's love confession | विराट कोहलीने या क्रिकेटरजवळ सर्वात आधी दिली होती अनुष्का शर्मासोबतच्या प्रेमाची कबुली

विराट कोहलीने या क्रिकेटरजवळ सर्वात आधी दिली होती अनुष्का शर्मासोबतच्या प्रेमाची कबुली

राट आणि अनुष्का नेहमीच आपल्या नात्याला घेऊन चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी तर दोघांनी एक अॅडसाठी शूट देखील केले होते. यावेळी दोघांची लजवाब केमिस्ट्री लोकांनी पाहिली. त्यानंतर दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगते आहे. दोघां या आधी अनेक वेळा पार्टीं आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी एकत्र दिसेल होते.  मात्र नुकात गौरव कपूरला दिलेल्या मुलाखतीत विराटनं अनेक गोष्टींवरुन पडदा उचलला. अनुष्का शर्मा माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाल्याची प्रमाणिक कबुली विराटने दिली.  पुढे विराट म्हणाला की, मुलाखतीदरम्यान विराट सांगितलं की, ‘अनुष्कासोबत असणारं माझं नातं मी सर्वात आधी झहीर खानसोबत शेअर केले होते. त्याच्या सल्ल्यामुळेच अनुष्का आणि माझं नातं आणखी मजबूत झालं.’

त्यावेळी झहीरनं विराटला सांगितले होते की, कधीही तुमचं नातं लापवण्याचा प्रयत्न करु नकोस तसं केलंस तर नात्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. झहीरच्या याच सल्ल्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी आपलं नातं कधीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या चार वर्षापासून दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. 

विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या अफेवा ही अनेकवेळा उडल्या होत्या. विराट कोहलीची मॅच पाहण्यासाठी कधी अनुष्का थेट ऑस्ट्रेलियात पोहचली तर कधी विराट अनुष्काच्या सिनेमाच्या प्रिमीयर सोहळ्याला हजर झाला. सध्या विराट आणि अनुष्काच्या लग्नाच्या चर्चा सगळकीकडे जोरात आहेत.  डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौºयात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि टी-२० सीरिज खेळली जाणार आहे.ह  श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे विराटकडे लग्नासाठी पुरेसा वेळ नसणार आहे. त्यामुळेच विराट आणि अनुष्का डिसेंबरमध्येच लग्न उरकण्याची तयारी करीत आहेत.  गेल्यावर्षी झालेल्या  युवराज सिंह व हेजल किचच्या लग्नाला हे दोघे उपस्थित होते. तर त्यानंतर यावर्षी मे महिन्यात झहिर खान व सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला दोघेही लव्हबर्ड्स एकत्र पोहोचले होते.

ALSO READ :  VIDEO:आयुष्यभर तुझी साथ निभावेन,रोमँटिक अंदाजात विराटची अनुष्काला प्रेमाची कबुली

Web Title: Virat Kohli was the first to confide with Anushka Sharma's love confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.