विराटचा आनंद गगनात मावेना, पिता बनल्यानंतर चाहत्यांना केली खास विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 19:16 IST2021-01-11T19:13:29+5:302021-01-11T19:16:19+5:30
विराट - अनुष्का दोघेही कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. आपल्या जीवनातील सुंदर क्षण ते फॅन्ससह शेअर करत असतात.मुलीच्या जन्माची बातमी शेअर करताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

विराटचा आनंद गगनात मावेना, पिता बनल्यानंतर चाहत्यांना केली खास विनंती
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी वर्षाची सुरूवात अत्यंत आनंदाने झाली आहे. विराट कोहली(Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा(Anushka Sharma) यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. कॅप्टन विराट कोहलीने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे की, आम्हाला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, मी आणि अनुष्का आज दुपारी एका मुलीचे आई-वडील बनलो आहे, आम्ही तुमच्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली जोडी माध्यमात चर्चेत होती. अनुष्काच्या प्रेग्नंसीदरम्यान छोट्यातली छोटी गोष्ट चर्चेत असायची.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
त्यामुळे विराट -अनुष्काला मुलगा होणार की मुलगी याकडेच सा-यांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आला आणि या दोघांच्या जीवनात गोंडस परीचं आगमन झालं. विराट - अनुष्का दोघेही कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. आपल्या जीवनातील सुंदर क्षण ते फॅन्ससह शेअर करत असतात.मुलीच्या जन्माची बातमी शेअर करताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान विराटनेही चाहत्यांना एक विनंती केली आहे. की,दोघांना आता एकमेकांना जास्त वेळ देण्याची गरज असल्याचं त्याने सांगत थोडी प्रायव्हसी देण्याची विनंती केली आहे.
काही दिवसांपूर्वीच पापाराझींनी अनुष्काचे विराटसोबतचे काही खासगी फोटो क्लिक केले होते आणि हे पाहून अनुष्का चांगलीच भडकली होती. तिने सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी व्यक्त करत, पापाराझींचा चांगलाच क्लास घेतला होता. अगदी कालपरवा विराट व अनुष्काचा त्यांच्या घरातील लॉबीतील फोटो व्हायरल झाले होते. विराट व अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वालिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झालेत. नेमक्या याच कारणाने अनुष्काचा पारा चढला होता.
तिने इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर करत, याबद्दल फोटोग्राफर्सला चांगलेच फैलावर घेतले. फोटोग्राफर्स आणि पब्लिकेशनला अनेकदा विनंती करूनही आमच्या खासगी आयुष्यात त्यांची दखल सुरुच आहे. हे सगळे आत्ताच्या आत्ता थांबवा, असे अनुष्काने या पोस्टमध्ये लिहिले होते.